BGauss A2 आणि B8 अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, फक्त 3 हजार रुपयांत करता येणार बुकिंग
इलेक्ट्रिक इंडस्ट्रीची दिग्गज कंपनी RR Global यांनी त्यांची मालकी हक्क असणारी कंपनी BGauss ने जुलै महिन्याच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. या दोन्ही स्कूटर BGauss A2 आणि BGauss B8 नावाने उतरवली आहे. आता कंपनीने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु केली आहे.
इलेक्ट्रिक इंडस्ट्रीची दिग्गज कंपनी RR Global यांनी त्यांची मालकी हक्क असणारी कंपनी BGauss ने जुलै महिन्याच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. या दोन्ही स्कूटर BGauss A2 आणि BGauss B8 नावाने उतरवली आहे. आता कंपनीने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु केली आहे. तसेच याच्या किंमतीबाबत सुद्धा खुलासा करण्यात आला आहे. BGauss A2B Gauss B8 या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही स्कूटर ग्राहकांना अवघ्या 3 हजार रुपयांत वेबसाईट्सवरुन बुकिंग करता येणार आहे.
BGauss A2 दोन वेरियंट- लेड अॅसिड आणि लिथिय आयन मध्ये उपलब्ध आहे. याची किंमत क्रमश: 52,499 रुपये आणि 67,999 रुपये आहे. तर BGauss B8 इलेक्ट्रिक स्कूटर तीन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये लेड अॅसिड मॉडेल, लिथिअम आयन मॉडेल आणि LI टेक्नॉलॉजी मॉडेल यांचा समावेश आहे. याची किंमत क्रमश: 62,999 रुपये, 82,999 रुपये आणि 88,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
BGauss A2 ही कंपनीची स्लो-स्पीड स्कूटर आहे. यामध्ये 250 वॅटचे मोटार दिले आहे. याची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. ही स्कूटर लेड-अॅसिट बॅठरी आणि 1.29 kW रिमुव्हेबल लिथियम आयन बॅटरी ऑप्शनसह येणार आहे. BGauss ने दावा केला आहे की, A2 इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यास 110 किमीचे अंतर कापू शकणार आहे. (Honda Forza 350 Maxi स्कूटर लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत)
B8 ही कंपनीची हायर परफॉर्मिंग स्कूटर असून यामध्ये 1900 वॅट, हम-माउंटेड मोटर आणि 1.45kWh ची बॅटरी दिली आहे. या स्कूटरमध्ये लेड-अॅसिट बॅटरी किंवा रिमुव्हेबल लिथिअल आयन बॅटरी ऑप्शनसह येणार आहे. B8 इलेक्ट्रिक स्कूटरच्या तिन्ही वेरियंटची टॉप स्पीड 50 किमी प्रति तास आहे. त्याचसोबत यामध्ये नेविगेशन असिस्टंट, लाईव्ह ट्रॅकिंग, जिओ-फेसिंग, राइड मॅट्रिक्स आणि रिमोट डायग्नोस्टिक्स सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. BGauss कंपनीने असा ही दावा केला आहे की, स्कूटरचा लेड-अॅसिड मॉडेल एकदा फुल चार्ज केल्यास 78 किमीचे अंतर धावणार आहे. (Honda X-Blade BS6 खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींबाबत जरुर जाणून घ्या)
BGauss या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लो, मिड आणि हाय असे तीन रायडिंग फिचर्स आहेत. A2 स्कूटर तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यासाठी ब्लू, ग्लेशियर आइस आणि व्हाईट कलर दिला आहे. तर B8 साठी रेड, ब्लू, ग्रे आणि व्हाईट कलर ऑप्शन ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, स्कूटरसाठी एलईडी इंस्ट्रुमेंट पॅनेल, डेटाइम रनिंग लाइट्स, कीलेस स्टार्ट, रिव्हर्स असिस्ट, साइड स्टँड सेंसरस सेंट्रलाइन्ड सीट लॉक, युएसबी चार्जिंग, अॅन्टी-थेफ्ट अलार्म आणि अॅन्टी थेफ्ट मोटर लॉकिंग सारखे ही फिचर्स मिळणार आहे. BGauss A2 और B8 या इलेक्ट्रिक स्कूटर्स बुकिंगसाठी सध्या बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि पनवेलसाठी उपलब्ध करुन दिली आहे. स्कुटरची डिलेव्हरी ऑगस्ट महिन्यापासून केली जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)