Bajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter
बजाज कंपनी पुढील वर्षी भारतामध्ये रेट्रो क्लासिक ई-स्कूटर(E-scooter) आणणार आहे.
भारतातील नामांकित अशी बजाज ऑटो कंपनी (Bajaj) नेहमीच काही ना काही नवीन गोष्टी ग्राहकांना देण्याच्या प्रयत्नात असते. सूत्रांनुसार, असे सांगण्यात येतय की, बजाज कंपनी पुढील वर्षी भारतामध्ये रेट्रो क्लासिक ई-स्कूटर(E-scooter) आणणार आहे. ही ऑटोमेटिक स्कूटर बजाज कंपनी अर्बनाइट ब्रँड(Urbanite) अंतर्गत विकेल. अलीकडे ही स्कूटर पुण्याच्या टेस्टिंग केंद्रात निदर्शनास आली. बजाज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी जरी ह्या बातमीत काही तथ्य नसल्याचे सांगितले असले तरीही बजाज कंपनी टू व्हिलर स्कूटरमध्ये काहीतरी नवीन बदल करुन ग्राहकांसाठी आणण्याच्या तयारीत आहे हेच एकूणच परिस्थितीवरुन दिसतय.
ही इलेक्ट्रिक अर्बनाइट स्कूटर ही बजाज कंपनीची पहिली ई स्कूटर असेल. नुकतीच ह्या स्कूटरच्या काही फोटोज इंटरनेट वर लीक झाली असून कंपनी चेतकला एका वेगळ्या रुपात ग्राहकांसमोर आणणार आहे, असेच ह्या चित्रांवरुन दिसतय.
कंपनीने ह्या ई-स्कूटरची चेतक(Chetak) , लेजंड(Legend) आणि stride अशी 3 नावे निश्चित केली आहेत. त्यातील चेतक ह्या नावाशी मोठ्या प्रमाणावर ग्राहक जो़डलेले असल्यामुळे तेच नाव निश्चित केले जाईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही ई स्कूटर रेट्रो स्टाईलमध्ये डिझाईन करण्यात आली असून पुढील वर्षी ही भारतात लाँच केली जाईल असे सांगण्यात येतय.
Bajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स
कंपनीने पुण्यातील टेस्टिंग सेंटरमध्ये ह्या ई-स्कूटरवर काम करणे सुरु केले आहे. ह्या स्कूटरमध्ये इन्स्ट्रूमेंटल पॅनल, स्मार्टफोन, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स असतील. ह्या स्कूटर मध्ये LED DRLs, डिजिटल इन्स्ट्रूमेंटल क्लस्टर, युएसबी चार्जर आणि बरेच खास वैशिष्ट्ये असतील. लवकरच ह्या ई स्कूटरची आणखी महत्त्वाचे फीचर्स समोर येतील.