बजाज ऑटो कंपनीची नवी बाइक Bajaj CT 100 भारतात लाँच, 'ही' आहेत याची खास वैशिष्ट्ये

100cc एंट्री लेवल बाइक्स मध्ये ही सर्वात स्वस्त बाइक आहे. मात्र स्टँडर्ड वेरियंटच्या तुलनेत ही थोडी महाग बाइक आहे.

Bajaj CT 100 (Photo Credits: Twitter)

ऑटो कंपनी बजाज (Bajaj Auto) नेहमीच आपल्या ग्राहकांना काही ना काही हटके आणि जबरदस्त प्रोडक्ट्स देण्याच्या प्रयत्नात असतात. ग्राहकांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी ही कंपनी एकाहून एक सरस बाईक्स बाजारात आणत असतात. नुकतीच या कंपनीने एक नवीन बाइक (Bike) भारतात (India) लाँच केली आहे. Bajaj CT 100 असे या बाइकचे नाव असून या बाइकमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. दिसायला आकर्षक मॉडेल (Model), आरामदायी आसने, सस्पेंशन सारखी जबरदस्त वैशिष्ट्ये या बाइक मध्ये देण्यात आली आहेत.

Bajaj CT 100 च्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, याची किंमत 46,432 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 100cc एंट्री लेवल बाइक्स मध्ये ही सर्वात स्वस्त बाइक आहे. मात्र स्टँडर्ड वेरियंटच्या तुलनेत ही थोडी महाग बाइक आहे. Bajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु

या बाइकच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 102cc सिंगल सिलेंडर एअर कोल्ड इंजिन दिला गेला आहे. इंजिनचा पॉवर आऊटपूट आणि टॉर्क 7.7bhp आणि 8Nm आहे. या बाइकमध्ये 4 स्पीड गियरबॉक्स दिला गेला आहे. यासोबत फ्रंट सस्पेंशन, रबर बेलोज, रबर टँक पॅड्स, क्रॉस ट्यूबसह हँडलबार सुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ही आधीच्या बाइकपेक्षा जास्त जाड.फ्लॅट आसनं बनविण्यात आली आहे.

यासह Bajaj CT 100 मध्ये क्लिइर लेन्स इंडिकेटर, एक्सटेंडेट मिरर बूट सारखे फिचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. यासह यात फ्यूल इंडिकेटरसुद्धा दिला गेला आहे. बजाज ने आपले इलेक्ट्रिक स्कूटर देखील याआधील लाँच केली आहेत. आपल्या प्रोडक्ट्समधून आपल्या ग्राहकांना उत्तमोउत्तम सुविधा देण्याचा बजाज ऑटो कंपनीचा नेहमी प्रयत्न असतो. त्यात ही आणलेली नवीन बाइक देखील ग्राहकांना खूप उत्कृष्ट अनुभव देईल असा या कंपनीला विश्वास आहे.