खुशखबर! सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच होणार 4 नवीन कार; जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत

या महिन्यात बर्‍याच कंपन्या आपल्यासाठी काही उत्तम कार घेऊन येत आहेत. या यादीमध्ये हॅचबॅकपासून ते सेडानपर्यंत गाड्या सामील आहेत.

Volkswagen Polo and Vento Facelift (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या ऑटो सेक्टरमध्ये (Auto Sector) मंदीचे वातावरण आहे. महिंद्राची वाहन विक्री 25 टक्क्यांनी घटली आहे, तर होंडाची वाहन विक्री तब्बल 51 टक्क्यांनी कमी झाली आहे. असे असूनही देशात असा एक वर्ग आहे जो उत्तम कारचा चाहता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नवीन कार (New Car) खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांसाठी खुशखबरी आहे. या महिन्यात बर्‍याच कंपन्या आपल्यासाठी काही उत्तम कार घेऊन येत आहेत. Cardekho.com वर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या यादीमध्ये हॅचबॅकपासून ते सेडानपर्यंत गाड्या सामील आहेत. चला पाहूया

लाँच तारीख: 4 सप्टेंबर 2019

अपेक्षित किंमत: 5.7 लाख ते 9.8 लाख (पोलो)

8.6 लाख ते 14.5 लाख (व्हेन्टो)

या दोन्ही कारला फेसलिफ्ट अपडेट देण्यात येण्याची ही पहिली वेळ नाही. फोक्सवॅगनची पोलो आणि व्हेंटो फेसलिफ्ट मॉडेल्स 4 सप्टेंबरला लाँच होणार आहेत. या दोन्ही कारमध्ये कंपनीने बीएस 6 वर अपग्रेड केलेले 1.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे.

अपेक्षित किंमत: 2 .8 लाख ते 4.75 लाख रुपये

रेनो इंडिया या महिन्यात आपल्या लोकप्रिय हॅचबॅक क्विडचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या कारची सादर होण्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. क्विड फेसलिफ्ट त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जन सिटी केझेडईवर आधारित आहे. कंपनीने क्विड फेसलिफ्टच्या डिझाईनमध्ये कॉस्मेटिक बदल केले आहेत पण आकारात कोणताही बदल झालेला नाही.

अपेक्षित किंमत: 14 लाख ते 20 लाख रुपये

कंपनीने आगामी एलांट्रा फेसलिफ्टच्या डिझाइनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अशी अपेक्षा आहे की कंपनी सेल्टोससह 1.5 लीटर डिझेल इंजिन देऊ शकेल. या कारच्या लॉन्चिंगशी संबंधित तारखा ह्युंदाईने जाहीर केल्या नाहीत. अशी अपेक्षा आहे की या महिन्यात एलांट्राचा फेसलिफ्ट अवतार ग्राहकांना दिसू शकेल.

अपेक्षित किंमत: 4 लाख

ही एक हॅचबॅकर असेल परंतु रेनो क्विड प्रमाणेच त्याचा स्टांस एसयूव्ही कारसारखा असेल. हे फ्यूचर एस संकल्पनेवर तयार केले गेले आहे जे 2018 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले गेले. ही कार शक्यतो या महिन्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे.