2021 Tata Safari SUV भारतात 22 फेब्रुवारी ला होणार लॉन्च; 30,000 पासून बुकिंग सुरु
टाटा मोटार्सने आपली नवी 2021 Tata Safari SUV कार लॉन्च करत असल्याची घोषणा केली आहे. ही कार 22 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, या कारच्या प्री-बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे.
टाटा मोटार्सने (Tata Motors) आपली नवी 2021 Tata Safari SUV कार लॉन्च करत असल्याची घोषणा केली आहे. ही कार 22 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, या कारच्या प्री-बुकींगला (Pre Booking) आजपासून (4 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेले 30,000 रुपयांचे पेमेंट करुन कार बुक करु शकतात. ही रक्कम रिफंडेबल असेल. तसंच देशातील सर्व अधिकृत डिलर्सकडे बुकींग सुरु झाली आहे.
टाटा सफारीची ही नवी एसयुव्ही OMEGARC च्या आर्किटेक्चरवर आधारीत आहे. या नवीन गाडीमध्ये ट्राय-अॅरो फ्रंट ग्रील, Xenon प्रोजेक्टर हेडलाईटन्स LED DRLs सह, stepped roof, उत्कृष्ट डिझाईनच्या टेललाईट्स, 18 इंची डायमंड कट alloy wheels, सफारी ब्रॅंडिग असलेलं रुफ एलईडी ट्विन लाईट टेललॅप आणि इतर खास फिचर्स देण्यात आले आहेत.
गाडीच्या इंटिरियर्समध्ये oyster white ही कलर स्कीम देण्यात आली आहे. यासोबत hash wood dashboard, लेदर रॅप स्टेअरिंग व्हिल, अँटी रिफलेक्टीव्ह असलेले सॉफ्ट टच डॅशबोर्ड, स्टेअरिंग व्हिलवर माऊंट असलेले ऑडिओ सिस्टम आणि टेलिफोनिक कंट्रोल, पॅरानॉमिक सनरुफ असे फिचर्स देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये 170 PS Kryotec डिझेल इंजिन दिले असून 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहेत. या एसयुव्ही मध्ये 8.8 इंचाचा डिस्प्ले सिस्टम माहिती आणि मनोरंजनासाठी दिला आहे. यासोबतच जेबीएल स्पीकर्स आयआरए कनेक्शन्स, इलेक्ट्रोनिक पार्किंग ब्रेक्स, 6 एअर बॅग्स, डिस्क ब्रेक्स आणि मल्टी ड्राईव्ह मोड्स यांसारखे अनोखे फिचर्स दिले आहेत.
नवीन सफारी कारला त्याच्या प्रिमीयम डिझाईनमुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गाडीच्या 3 रो मधील सिट्स खूप आरामदायी आहेत. ही गाडी लॉन्च करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. आजपासून नवी सफारी कार डिस्प्ले आणि टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध असेल. तसंच आमच्या सर्व नेटवर्कमध्ये या कारचे प्री-बुकींग सुरु होईल, अशी माहिती टाटा मोटार्सच्या पॅसेंजर व्हेहिकल बिजनेस युनिटचे प्रेसिडेंट शैलेश चंद्रा यांनी दिली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)