2019 Maruti Suzuki Ignis ही नवीकोरी कार भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

भारतातील अग्रणी ऑटोमेकर कंपनी मारुती सुझुकीने आज (27/2/2019) नव्याकोऱ्या 2019 Maruti Ignis ही कार भारतात लॉन्च केली.

Maruti Suzuki Ignis 2019 (File Photo)

भारतातील अग्रणी ऑटोमेकर कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आज (27/2/2019) नवी 2019 Maruti Ignis ही कार भारतात लॉन्च केली. भारतात या कारची स्टार्टिंग प्राईज आहे- 4.79 लाख रुपये. या कारमध्ये नवे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात रिव्हर्स पार्किंग असिस्ट हॅचबॅक सिस्टम सिस्टम, को-ड्रायव्हर सिट बेल्ट रिमांयडर आणि हाय स्पीड सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर्स सर्व वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.

या नव्या कारमध्ये 4 ट्रिम लेव्हल्स आहेत- सिगमा, डेल्टा, झेटा आणि अल्फा. यात डुअल एअरबॅग्स, सिल्ट बेल्ट हे फिचर्स देण्यात आले आहे. 2019 Maruti Ignis ही कार खूप कमी इंधनाचा वापर करते आणि 20.89 प्रती लिटर इतका अॅव्हरेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

मारुती सुझुकी कारची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 3700mm, 1690mm, 1595mm इतकी आहे. कारची विलबेस आणि ग्राऊंड क्लिअरन्स अनुक्रमे 2435mm आणि 180mm इतके आहे.

2019 Maruti Ignis ही नवीकोरी कार 9 शेड्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सा ब्लु, ग्रे, सिल्की सिल्वर, पर्ल अॅरेटीक व्हाईट, टिनसेल ब्लू, अपटाऊन रेड, टिनसेल ब्लू विथ पर्ल अॅरेटीक व्हाईट, टिनसेल ब्लू विथ मिडनाईट ब्लॅक आणि अपटाऊन रेड विथ मिडनाईट ब्लॅक.

किंमती

वेरिएंट्स Ex-Showroom Price (Manual) Ex-Showroom Price (AMT)
Sigma Rs 4.79 Lakh -
Delta Rs 5.40 Lakh Rs 5.87 Lakh
Zeta Rs 5.82 Lakh Rs 6.29 Lakh
Alpha Rs 6.67 Lakh Rs 7.14 Lakh

 

या कारमध्ये 1.2 लिटर VVT, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन, 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT gearbox देण्यात आला आहे. या इंजिनमध्ये113 Nm @ 4200 आरपीएमच्या सर्वोच्च टॉर्कसह 81bhp @ 6000 आरपीएम इतकी पॉवर जनरेट करेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now