एदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय

कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान (Constitutional Democratic Party of Japan) या पक्षाकडून योगेंद्र पुराणिक आपलं नशीब जपानच्या राजकारणामध्ये आजमावणार आहेत.

Yogendra Puranik (Photo Credits: Facebook)

Japan Local Body Elections 2019: महाराष्ट्रासह भारत देशामध्ये सध्या लोकसभा निवडणूक 2019 चे वारे वाहत आहेत. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जपानमध्ये योगेंद्र सध्या निवडणूकीदरम्यान मतांचा जोगवा मागत आहेत. योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) हे मूळचे पुण्याचे मात्र सध्या ते जपानच्या महापालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. जपानमध्ये निवडणूक लढवणारे योगेंद्र पुराणिक हे पहिलेच भारतीय आहेत.

येत्या 21 एप्रिलला जपानमध्ये महापालिका निवडणूकांसाठी मतदान होणार आहे. या मतदानादरम्यान कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान (Constitutional Democratic Party of Japan) या पक्षाकडून योगेंद्र आपलं नशीब आजमावणार आहेत. जपानच्या एदोगावा महापालिकेसाठी हे मतदान पार पडेल तर 22 एप्रिल रोजी त्याचा निकाल हाती येणार आहे.

 योगेंद्र पुराणिक यांच्या प्रचाराची झलक

योगेंद्र मूळचे पुण्याचे असून 1997 साली ते शिक्षणासाठी जपानला गेले पुढे बॅंकींग क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केल्यानंतर आता ते जपानच्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now