World’s Richest People List 2020: Mukesh Ambani यांना पिछाडीवर टाकत Elon Musk जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी; एकूण संपत्ती $84.8 billion!
आता मुकेश अंबानी सहाव्या स्थानी पोहचले आहेत.
Tesla आणि SpaceX चा CEO Elon Musk हा आता जगातला चौथा श्रीमंत व्यक्ती बनला आहे. दरम्यान एका दिवसात $7.78 billionसंपत्तीमध्ये वाढ झाल्याने आता त्याची एकूण संपत्ती $84.8 billion इतकी झाली आहे. सोमवारी टेस्लाचे शेअर्स 11% नी वाढल्यानंतर त्याने श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये झेप घेत रिलायंस समुहाचे प्रमुख (RIL Chairman Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे. आता मुकेश अंबानी सहाव्या स्थानी पोहचले आहेत.
दरम्यान Bloomberg Billionaires Index च्या यादीमध्ये श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी मिळवले आहे. या यादीत त्याने Arnault ($84.6 billion), मुकेश अंबानी ($78.8 billion) आणि Warren Buffet यांना मागे टाकले आहे.
49 वर्षीय एलॉन मस्क याची आता जगातील सर्वात 5 श्रीमंतांच्या यादीमध्ये एंट्री झाली आहे. दरम्यान त्याच्यापुढे सध्या फेसबूकचा सर्वेसवा मार्क झुगरबर्ग ($99 billion), बिल गेट्स ($121 billion) आणि Jeff Bezos ($188 billion)आहे.
यंदाच्या वर्षी एलॉनच्या दोन्ही कंपन्यांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. कोरोना संकटात इतरांच्या संपत्तीमध्ये घट होत असताना एलॉनकडे $57 billion वाढ ही उल्लेखनीय गोष्ट आहे. 2020 मध्ये अमेझॉनच्या Jeff Bezos नंतर नेट वर्थमध्ये वाढ होणारा एलॉन हा दुसरा व्यक्ती ठरला आहे.