WikiLeaks संस्थापक ज्युलियन असांज यांना ब्रिटीश पोलिसांकडून अटक
ज्युलियन असांजे हे लंडन (London) येथील इक्वाडोर ( Ecuador) येथील दूतावासात राहात होते. या दूतावासातूनच त्याला ताब्यात घेण्यात आले.
जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या विकिलीक्स (WikiLeaks) संस्थेचा संस्थापक ज्युलियन असांज (Julian Assange) यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. ज्युलियन असांज हे लंडन (London) येथील इक्वेडोर ( Ecuador) येथील दूतावासात राहात होते. या दूतावासातूनच त्याला ताब्यात घेण्यात आले.
बीबीसी आणि एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटीश पोलिसांनीही असांज यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांना लवकरच वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केले जाणार आहे. असांज याला अटक व्हावी ही जगभरातील अनेक मंडळींची इच्छा होती. कारण, त्याने जगभरातील अनेक देशांतील राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण असांजने जाहीर केले होते.
असांज यांनी इग्लंड येथील इक्वाडोर दुतासावाकडे राजाश्रय मागीतला होता. अटक टळावी या उद्देशाने असांज दुसवासात राहात होते. मात्र, इक्वाडोर दुतावासाने असांज यांचा आश्रय काढून घेताच त्यांना अटक करण्यात आली. विविध देशातील राजकारणी आणि गुप्त प्रकरणांची कागदपत्रं आसांज यांनी जाहीर केली होती. (हेही वाचा, Brexit Deal: ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दुसर्यांदा 'ब्रेक्झिट करार' नाकारला)
2010 मध्ये असांज याने पहिल्यांदा गुप्त कागदपत्रं जाहीर केली. त्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. 2012 पासून तो इक्वाडोर येथे राहात होता. 12 डिसेंबर 2018 मध्ये त्यांना इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते. आता त्यांना अटक झाल्याने जगभरातील मंडळींनी सुटकेचा निश्वास सोडला असेल असे बोलले जाऊ लागले आहे.