Warren Buffett यांचा बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा

फाउंडेशनचे संस्थापकांमध्ये घटस्फोट होणाार असल्याच्या कारणामुळे चॅरिटीमध्ये येणाऱ्या समस्यांच्या कारणास्तव वॉरन बफेट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

Warren Buffett (Photo Credits-Twitter)

देशातील प्रसिद्ध उद्योगपतींमधील Warren Buffet यांनी बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा दिला आहे. फाउंडेशनचे संस्थापकांमध्ये घटस्फोट होणाार असल्याच्या कारणामुळे चॅरिटीमध्ये येणाऱ्या समस्यांच्या कारणास्तव वॉरन बफेट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 90 वर्षीय बफेट यांनी बुधावारी एक विधान जाहीर करत हा निर्णय सुनावला आहे. त्यांनी असे म्हटले की, माझ्या लक्ष्य फाउंडेशनच्या उद्देष्याच्या दृष्टीने 100 टक्के सिंक आहे. तर बार्कशायर हेथवेचे सर्व शेअर चॅरिटीसाठी देण्यात येणार आहेत. वॉरन बफेट यांनी गेल्या 15 वर्षात 27 बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक रक्कम चॅरिटीसाठी दिली आहे.

बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या तीन बोर्ड मेंबर्समध्ये वॉरन बफेट यांचा सहभाग होता. बोर्डमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त बिल आणि मेलिंडा यांचा सुद्धा समावेश होता. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क सुजमॅन यांनी गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांना असे म्हटले होते की, फाउंडेशनची दीर्घकाळ स्थिरता मजबूत करण्यासाठी बातचीत करत आहोत.(काय सांगता? जेफ बेजोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी MacKenzie Scott यांनी केले 19,800 कोटींचे दान; 286 संघटनांना मिळाली मदत)

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स गेल्या 27 वर्षापासून एकत्र राहत असून आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी गेल्या महिन्यात मेलिंडा हिच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, आम्हाला असे वाटत नाही की आम्ही पुढील आयुष्यात एकत्रित नवरा-बायकोच्या रुपात पुढे राहू शकत नाहीत. मात्र ते दोघे बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत काम करणार आहेत.