PM Modi Condemns Attack On Donald Trump: 'राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पंतप्रधान मोदींकडून निषेध

पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प एका प्रचार रॅलीला संबोधित करत होते. या घटनेचा पंतप्रधान मोदींनी निषेध केला आहे,

Photo Credit- X

PM Modi Condemns Attack On Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प एका प्रचार रॅलीला संबोधित करत होते. त्याचवेळी अचानक गोळीबाराचा आवाज झाला. सुदैवाने या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर प्रतिक्रीया व्यक्त केली. 'माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चिंतेत आहे. घटनेचा तीव्र निषेध असून राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत, जखमी झालेल्या आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Gunshots At Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात वाचला जीव; रॅलीत गोळीबार)

पंतप्रधान मोदी यांची पोस्ट

या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर तेथे मोठी आरडाओरड झाली. सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने सुरक्षास्थळी नेले. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत.