Bangladesh Election 2024: बांग्लादेशमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार, ढाका येथे बेनापोल एक्सप्रेस ट्रेनला आग; चौघांचा मृत्यू

या आगीत पाच डबे जळून खाक (Train Catches Fire) झाले तर चौघांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. मात्र, त्याची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.

Benapole Express Train | (Photo Credit: X)

बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 (Bangladesh Election 2024) दरम्यान हिंसाचार भडकला आहे. देशाची राजधानी ढाका (Dhaka) येथे जमावातील अज्ञातांनी बेनापोल एक्सप्रेस ट्रेनला (Benapole Express Train) आग लावली. या आगीत पाच डबे जळून खाक (Train Catches Fire) झाले तर चौघांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. मात्र, त्याची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही. जमावाकडून शिकार झालेली ट्रेन भारतीय सीमेला लागून असलेल्या बंदराचे शह बेनपोलवरुन ढाक्याला आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री साधारण 9.05 वाजण्याच्या सुमारास घडली. कमलापूर रेल्वे स्टेशनजवळ काही समाज कंटकांनी बेनापोल एक्सप्रेसला आग लावली.

आगीवर नियंत्रण, पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध सुरु

हिंसाचार आणि आगीच्या घटनेची बांग्लादेश पोलीसांनी नोंद घेतली आहे. हल्लोखोरांचा शोध घेतला जात आहे मात्र अद्याप त्यांची ओळख पटली नाही. परिणामी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ज्यांनी मोठ्या शथापीने आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अग्निशमन दल आणि नागरी सेवा कर्तव्य विभागाचे प्रमुख रकीबूल हसन यांनी दिली.  (हेही वाचा, Nobel Laureate Muhammad Yunus Sentenced Jail: नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना बांगलादेश न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा; जाणून घ्या काय आहेत आरोप)

तोडफोड आणि हिंसाचार

ढाका मेट्रोपोलीटन पोलीस डीएमपी आणि गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त महिद उद्दीन यांनी माहिती देताना ही घटना ठरवून केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आगोदर ही घटना घडली आहे. आम्ही हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांनी तोडफोड आणि हिंसाचार केला आहे. अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितले की, हल्लेखोरांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. महिला, मुले आणि नागरिक प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असे वर्तन करणे अमानुष आहे. शासकीय सेवां, मालमत्ता या सार्वजनिक असतात. त्याचे नुकसान करणे चुकीचे असल्याचेही अधिकारी म्हणाले. (हेही वाचा, Hindu Temple Vandalised In US: अमेरिकेच्या California मध्ये अजून एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी समर्थकांकडून हल्ला; आठवडाभरातील दुसरी घटना)

प्रवासी असल्याचे भासवून ट्रेनमध्ये प्रवेश

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गुन्हेगारांनी प्रवाशी असल्याचे भासवून ट्रेनमध्ये प्रवेश केला असावा. ढाका रेल्वे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अशरफ हुसैन यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 9.06 वाजता ट्रेनला आग लागल्याची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांकावरून मिळाली. दरम्यान, आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरु होते.

व्हिडिओ

बांगलादेशात रविवारी (7 जानेवारी) सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत., ज्यामध्ये पंतप्रधान शेख हसीना सलग चौथ्यांदा आणि त्यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील युतीसाठी पाचव्यांदा मैदानात आहेत. सध्या प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. कारण हसीना यांनी राजीनामा देण्याची आणि काळजीवाहू सरकारची निवडणूक चालवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.अशा स्थितीमध्ये बांग्लादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे.