IPL Auction 2025 Live

भारत दौर्‍यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पीएम नरेंद्र मोदी माझ्या पसंतीचे पण व्यापार करार होणार नसल्याचे दिले संकेत

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेच्या दरम्यान ट्रेड डील होणार नसल्याचं म्हटलं आहे

नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप (Photo Credits: IANS)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आगामी भारत दौर्‍यापूर्वी भारत आणि अमेरिकेदरम्यान होणार्‍या व्यापार करारावर मोठं विधान दिलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेच्या दरम्यान ट्रेड डील होणार नसल्याचं म्हटलं आहे. नुकताच एका खास व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पसंतीचे आहेत. मात्र सध्या ट्रेड डिल होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र भविष्यात त्याबाबत विचार केला जात आहे. दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीपूर्वी हा निर्णय घेतला जाणार की नाही? याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा.  

ANIच्या रिपोर्ट नुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मला पीएम नरेंद्र मोदी पसंत आहेत, मला दिलेल्या माहितीनुसार, एअरपोर्ट आणि इव्हेंट दरम्यान 70 लाख लोकं येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटेरा स्टेडियम बाबत बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये हे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बनत आहे त्यामुळे हा इव्हेंट भव्य दिव्य होईल असं म्हणत भारत दौर्‍याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ

सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासमवेत भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत दौऱ्यासाठी पुन्हा आमंत्रण दिले होते. लवकरच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. तसेच ट्रम्प आणि मोदी यांच्यातही चर्चा होईल.