US: म्युजिक फेस्टिव्हलमध्ये स्टेजच्या जवळ जाण्यासाठी प्रेक्षकांची एकमेकांना धक्काबुक्की, 8 जणांचा मृत्यू
अमेरिकेतील दक्षिणेला असलेल्या टेक्सास येथील ह्युस्टन मध्ये एस्ट्रोवर्ल्ड म्युजिक फेस्टिव्हल दरम्यान जवळजवळ 8 जणांचा मृत्यू आणि अन्य काही जण जखमी झाले आहेत.
US: अमेरिकेतील दक्षिणेला असलेल्या टेक्सास येथील ह्युस्टन मध्ये एस्ट्रोवर्ल्ड म्युजिक फेस्टिव्हल दरम्यान जवळजवळ 8 जणांचा मृत्यू आणि अन्य काही जण जखमी झाले आहेत. ह्सुस्टनमध्ये अग्निशमन विभागाचे प्रमुख सॅम्युअल पेन्या यांनी जखमींची माहिती देत असे म्हटले की, ही घटना रात्री 9 वाजता घडली आहे. जेव्हा लोक स्टेजजवळ येण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करु लागले होते.(Diwali in US: अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden यांनी थाटामाटात साजरी केली दिवाळी; पहिल्यांदाच दिवाळीच्या थीमवर सजले One World Trade Center Watch Video)
पेन्या यांनी म्हटले की, आम्हाला सुरुवातीला चौकशीदरम्यान कळले मोठ्या प्रमाणत लोक स्टेजजवळ जात होते. याच कारणामुळे लोक एकमेकांना ढकलत होते. यामध्ये काही जणांना जखमा झाल्या. त्याचसोबत 17 जणांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यामधील 11 लोकांना हृदयविकाराचा झटका सुद्धा आला. पुढे त्यांनी असे सांगितले की, या मध्ये कमीतकमी आठ जणांचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. मृतांचा पूर्णपणे वैद्यकिय तपास होईपर्यंत काही सांगू शकत नाही असे पेन्या यांनी स्पष्ट केले आहे.(Island of Gold: इंडोनेशियातील मच्छिमारांना सापडले 700 वर्षांपूर्वी गायब झालेले 'सोन्याचे बेट'; हाती लागला अब्जावधींचा खजिना)
दरम्यान, रॅपर ट्रॅविस स्कॉट याच्या एस्ट्रोवर्ल्ड फेस्टिव्हलसाठी जवळजवळ 50 हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. ह्युस्टन पोलिसांनी असे म्हटले की, ऐवढ्या मोठ्या संख्येने लोक जखमी कशी झाली याबद्दल तपास करत आहे. या संदर्भात म्युजिक एरीनाचे व्हिडिओ फुटेज सुद्धा तपासून पाहिले जात आहे. या घटनेमुळे म्युजिक कार्यक्रस्ट रद्द करण्यात आला. तर एस्ट्रोवर्ल्ड अमेरिकेतील रॅपर ट्रॅविस स्कॉट द्वारे तयार करण्यात आलेला एक म्युजिक कार्यक्रम असून तो 2018 पासून सुरु करण्यात आला होता.