Tulsi Gabbard यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं, Hawaii मध्ये केली अधिकृत घोषणा

तुलसी गबार्ड या हवाई (Hawaii) या शहरातून प्रचाराला सुरुवात केली आहे.

Tulsi Gabbard. (Photo Credit: @revndm)

पहिली हिंदू अमेरिकन महिला काँग्रेस सदस्य तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard) यांनी 2020 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तुलसी गबार्ड या हवाई (Hawaii) या शहरातून प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी अमेरिकेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये याबद्दलची माहिती देताना अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

'अमेरिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उभं राहण्यासाठी मला तुमची गरज आहे. पुढचा रस्ता आपल्यासाठी खडतर असेल पण साऱ्या अडथळयांवर मात करून उभं राहू शकतो कारण जेव्हा देशावर प्रेम करणारे एकत्र येतात तेव्हा कोणत्याही अडथळ्याचा सामना करण्याचं बळ निर्माण होतं. मग अशी कोणतीच लढाई नसेल जी आपण एकत्र येऊन लढू शकत नाही. ' असं भावनात्मक आवाहन तुलसी यांनी अमेरिकन मतदारांना केलं आहे. ' एका सैनिकाच्या मनात देशसेवा आणि देशप्रेमाची भावना सर्वात अधिक असते त्याच भावनेला घेऊन मी राष्ट्रपती सदनात जाणार आहे. ' असे तुलसी म्हणाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 च्या शर्यतीत उतरणाऱ्या पहिल्या हिंदू उमेदवार Tulsi Gabbard यांच्याबद्दल काही खास गोष्टी!

तुलसी गबार्ड या इराक युद्धामध्ये अमेरीकन सैनिक म्हणून लढल्या होत्या. त्यानंतर 2016 मध्ये सिनेटर म्हणून निवडून आल्या. 2013 पासून त्या हवाई मध्ये काँग्रेसवुमन म्हणून काम करत आहेत.