US Capitol Violence: ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारी आंदोलनात एका महिलेचा मृत्यू; Twitter, Facebook आणि Youtube कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव सहन न झालेल्या हजारो ट्रम्प समर्थकांनी बुधवारी युएस कॅपिटल इमारतीत घुसून गोंधळ घातला. त्याठिकाणी निवडणुकीच्या निकालाबाबत बैठक सुरु होती.

Violence at Capitol Building (Photo Credits: ANI)

अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत (US Capitol Building) झालेल्या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव सहन न झालेल्या हजारो ट्रम्प समर्थकांनी बुधवारी युएस कॅपिटल इमारतीत घुसून गोंधळ घातला. त्याठिकाणी निवडणुकीच्या निकालाबाबत बैठक सुरु होती. ट्रम्प समर्थकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत इमारतीत घुसून  एकच गदारोळ केला. त्यानंतर पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट सुरु झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वादग्रस्त ट्विट केल्यामुळे ट्विटरने त्यांचे अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केले होते. तसंच वादग्रस्त ट्विट न हटवल्यास अकाऊंट कायमस्वरुपी बॅन करण्याचा इशाराही ट्विटरकडून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे फेसबुक आणि युट्युबने देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त व्हिडिओज हटवले आहेत. त्याचबरोबर त्यांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटही तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहे. दरम्यान, युएस कॅपिटल इमारतीला लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून इतर इमारती देखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

ANI Tweet:

या सर्व प्रकारावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, "समर्थकांनी उचललेले पाऊल अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायी आहे. अमेरिकेला ही वेळ पाहावी लागते हे अत्यंत दुर्दैवी आहे." 'dark moment'असा त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

"युएस कॅपिटल इमारतीत झालेल्या हिंसाचार हा अमेरिकेच्या इतिहास सदैव लक्षात राहील आणि एका पराभव झालेल्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे," असे अमेरिकीचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसंच आपला पक्ष हा कायदा आणि सुव्यवस्थेचा असून आपण कायद्याचा आदर करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या हिंसाचारी आंदोलनानंतर मेनिलिया ट्रम्प यांच्या चीफ स्टाफ Stephanie Grisham यांनी राजिनामा दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif