26/11 Mumbai Terror Attack: दहशतवादी हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून 50 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर
हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी केली आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होऊनही यातील दोषींवर कारवाई कारवाई न होणे, हा पीडितांचा अपमान आहे. हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटले आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठी अमेरिकेने बक्षिसातही वाढ केली आहे.
हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी 50 लाख डॉलर म्हणजेच 35 कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी अमेरिकेच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. अमेरिकन नागरिकांच्या वतीने मुंबईकरांना बळ मिळावे, असेही ते यावेळी म्हणाले.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत असून या हल्ल्यात शहीद झालेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस विभाग आणि राज्यपाल सी विद्यासागर राव श्रद्धांजली वाहणार आहेत.