भूतांशी संभोग केल्याचा दावा ,Ghost Baby जन्माला घालणार?
एमथिस्ट रील्म ( फोटो सौजन्य- This Morning You Tube Channel)

युनायडेट किंगडम येथील ब्रिस्टल येथे राहणाऱ्या एका महिलेने आपण लवकरच भूताच्या बाळाला जन्म देणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गोष्टींवर विश्वास बसत नाही? परंतु हे सत्य असल्याचे या महिलेने एका मुलाखतीत सांगितले आहे.

एमथिस्ट रील्म असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असून ते दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार होते. मात्र तिच्या प्रियकराच्या कामाच्या बदल्यांमुळे या दोघांना योग्य लग्नासाठीचा दिवस मिळत नव्हता. त्यामुळे ही महिला राहत असलेल्या ठिकाणी तिचा एका भूताशी संपर्क आल्याचे तिने सांगितले. तर तिच्यावर काही कारणास्तव संशय आल्याने तिच्या प्रियकराने तिच्याशी ब्रेकअप केले होते. त्यानंतरच्या काळात तिचे 11 भूतांशी संपर्क आले होते. मात्र एक दिवस एमथिस्ट तिच्या घराजवळील झाडाझुडुपांच्या नजीक फिरत असताना एका अविश्वासनीय ऊर्जेचा तिला स्पर्श झाला. त्यावेळी तिला आपल्याला नवा प्रियकर मिळाला असल्याचे तिला वाटले. तसेच या महिलेने आपण या भूताशी खूप वेळ गप्पा मारण्याबरोबर संभोगाचा आनंद घेत असल्याचे विचित्र विधान केले आहे. तसेच आम्ही दोघे या प्रेमसंबंधी खूप सिरियस असल्याचे ही या महिलेचे म्हणणे आहे.

या महिलेने केलेल्या या दाव्यामुळे प्रत्यक्षात भूत आहे का असा प्रश्न लोकांना पडला आहे. तर या महिलेने चक्क 14 भूतांशी संभोग केल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. मात्र या महिलेच्या दाव्यात किती तथ्थ किंवा ही महिला फक्त लोकांना गंडवत असल्याच्या प्रतिक्रिया लोक तिच्या संदर्भात देत आहेत.