UBS Layoffs: यूबीएस स्विस बँकिंग कंपनीत कर्मचारी कपात; 30,000 ते 35,000 कर्मचाऱ्यांच्या कामावर येणार गदा
जूनपर्यंत यूबीएसमध्ये कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 30,000 ते 35,000 कर्मचाऱ्यांच्या कामावर गदा येणार आहे.
UBS Layoffs: यूबीएस (UBS)स्विस बँकिंग कंपनीने कर्मचारी कपात (Layoffs)करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत यूबीएसमध्ये कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. पाच टप्प्यात ही कर्मचारी कपात होणार आहे. कंपनीचे कामकाज व्यवस्थित, नियोजित आणि चांगले करण्यासाठी UBS ने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. या कर्मचारी कपातीमधून कंपनीचा USD 10 अब्ज पेक्षा जास्त खर्च कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे त्यांच्या 30,000 ते 35,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
यूबीएस कॉस्ट-कटिंग स्ट्रॅटेजीज आणि इम्पॅक्ट
रिपब्लिक वर्ल्डच्या अहवालानुसार, यूबीएस जूनपासून सुरू होणाऱ्या पाच वेगळ्या टप्प्यांमध्ये कर्मचारी कपात करणार आहे. हा दृष्टीकोन कंपनीमधील धोरणात्मक पुनर्रचनेचा सूचक आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहेत. पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणारी कर्मचारी कपात कदाचित ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होऊ शकते.