COVID-19 Vaccine Update: Pfizer कंपनीने लवकर लस सुरक्षिततेचा डाटा सादर केल्यास अमेरिकेमध्ये डिसेंबर 2020 पासून लसीकरणाला होऊ शकते सुरूवात

अमेरिकेच्या फायजर (Pfizer) या कोविड 19 वरील लसीने 90% प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

मागील वर्षभर कोरोना वायरसच्या (Coronavirus) सावटाखाली जगणार्‍या मानवजातीसाठी आता आशेचे किरण दिसायला सुरूवात झाली आहेत. अमेरिकेच्या फायजर (Pfizer) या कोविड 19 वरील लसीने 90% प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जर त्यांनी अहवाल लवकरात लवकर अमेरिकेतील हेल्थ रेग्युलेटर्सकडे सादर केला तर अमेरिकेमध्ये डिसेंबर 2020 पासून लसीकरणाला सुरूवात होऊ शकते असे अमेरिकेचे Health Secretary Alex Azar यांनी म्हटले आहे. Corona Vaccine: Pfizer ने विकसित केलेली कोरोना लस 90 टक्के परिणामकारक; तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत स्पष्ट.

दरम्यान या आठवड्याच्या सुरूवातीलाच फायझर कंपनीने कोविड 19 बद्दल गूड न्यूज शेअर केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फायझर ही लस जर्मनी कंपनी BioNTech SE सोबत विकसित केली आहे. ही 90% प्रभावी आहे. हे mRNA बेस्ड व्हॅक्सिन असून त्याला टिकवण्यासाठी -70 ते 80 अंश सेल्सियस तापमानाची गरज असते. तसेच हे वॅक्सिन 2 वर्षापर्यंत तुमचं रक्षण करू शकते 2 वर्षांनंतर तुम्हांला त्याचा बुस्टर डॉस घ्यावा लागेल असे सांगण्यात आले आहेत. सध्या लाखोच्या घरात 24 तासांत नव्या कोरोनारूग्णांची भर पडणार्‍या अमेरिकेमध्ये ही लस आता सामान्यांसाठी मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे.

फायझरचा सेफ्टी डाटा पुढील आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचे युएस ड्रग्स मेकर कंपनीने दावा केला आहे. त्यामुळे तो हाती आल्यानंतर अमेरिकेत FDA कडे इमरजंसी ऑथरायझेशन साठी अर्ज केला जाणार आहे. अमेरिकेच्या सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी परवानगी दिल्यास आणि सारं काही सुरळीत, सुरक्षित झाल्यास ही लस अमेरिकेसोबतच जगातील इतर देशांसाठीदेखील कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकेल अशी आशा आहे. या लसीचे अमेरिकेत दरमहा 20 मिलियन डोसेस मिळणार आहे अशी देखील माहिती देण्यात आली आहे.