Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दोन बॉम्बस्फोट, एका पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू; 20 जण जखमी
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मशिदीत स्फोट झाला तेव्हा लोक नमाज अदा करत होते.
Pakistan Bomb Blast: ईदच्या आधी, पाकिस्तान (Pakistan) च्या अशांत बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात एका पोलिसासह किमान तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात अन्य 20 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
पहिल्या घटनेत सोमवारी प्रांतातील क्वेटा जिल्ह्यातील कुचलाक भागात एका मशिदीत झालेल्या स्फोटात एक पोलिस ठार झाला तर अन्य 15 जण जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मशिदीत स्फोट झाला तेव्हा लोक नमाज अदा करत होते. (हेही वाचा - Mozambique Boat Sank: दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना, स्थलांतरित लोकांचे जहाज समुद्रात बुडालं)
दुसऱ्या एका घटनेत सोमवारी खुजदार शहरातील उमर फारुख चौकाजवळील बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात दोन ठार तर पाच जण जखमी झाले. दरम्यान, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ईदच्या खरेदीसाठी बाजारात महिला आणि लहान मुलांसह गर्दी असताना हा स्फोट झाला.