हवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता
आज (गुरुवारी) सकाळी हवेत तेल भरण्यादरम्यान दोन अमेरिकन लष्करी विमानांची, एफ-18 (F18) आणि केसी-130 (KC130) हवेत टक्कर झाली
आज (गुरुवारी) सकाळी हवेत तेल भरण्यादरम्यान दोन अमेरिकन लष्करी विमानांची, एफ-18 (F18) आणि केसी-130 (KC130) हवेत टक्कर झाल्याचे वृत्त आहे. एका विमानात 5 तर दुसऱ्या विमानात 2 नौसैनिक प्रवास करीत होते. या अपघातानंतर 6 अमेरिकन नौसैनिक बेपत्ता झाले आहेत. एका नौसैनिकाचा शोध लागला असून इतरांच्यासाठीची शोध मोहीम अजून चालू आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून 300 किमी अंतरावर झाला आहे.
हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी KC-130 या विमानाचा वापर होतो. तर McDonnell Douglas F/A-18 Hornet या लढाऊ विमानाची मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आणि बाँब घेऊन जाण्याची क्षमता आहे. अमेरिकेच्या या दोन्ही विमानांनी त्यांच्या नियमित प्रशिक्षणासाठी मरिन कॉप्स एअर स्टेशनवरून उड्डाण घेतले होते. त्यानंतर हवेत इंधन भरत असताना या दोन विमानांची एकमेकांना धडक बसली. अपघातात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जपानने चार एअरक्राफ्ट आणि तीन जहाजे रवाना केली आहेत.