Istanbul Night Club Fire: इस्तंबूलमधील नाईट क्लबला भीषण आग; 29 जणांचा होरपळून मृत्यू

आगीत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अधिकांश रेनोव्हेशन कामातील मजूर होते.

(Image Credit - ANI Twiiter)

तुर्कीमधील सर्वात मोठे शहर इस्तंबूलमधील एका नाईट क्लबला (Istanbul Night Club) मोठी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत कमीत कमी 29 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण गंभाररित्या जखमी देखील झाले आहेत. याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा - Taiwan Earthquake: तैवानमध्ये 7.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप, जपानमध्ये त्सनामीचा इशारा)

पाहा पोस्ट -

स्थानीक राज्यपाल कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रुग्णालयात फक्त एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. मस्करेड नाईट क्लब अनेक दिवस बंद होता. इमारतीत रिनोव्हेशनचे काम सुरू होते. हा नाईट क्लब 16 मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये होता. गवर्नरने सांगितले की, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आगीत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अधिकांश रेनोव्हेशन कामातील मजूर होते.

पाहा पोस्ट -

तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक म्हणाले आहेत की, इस्तंबूलच्या बेसिकटास जिल्ह्यातील गेरेटेपे जिल्ह्यात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्यांवर माजी श्रद्धांजली. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी पार्थना करत आहे. आगीप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर इकरेम इमामोगलू यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण इमारतीची पाहणी केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन व वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.