Mississippi Tornado Strikes: अमेरिकेतील मिसिसिपीला चक्रीवादळाचा तडाखा, 23 नागरिकांचा मृत्यू, अनेक जण बेघर
या चक्रिवादळामुळे अनेक जण बेपत्ता झाले असून शेकडो लोक बेघर देखील झाले आहेत.या वादळात सुमारे 100 मैलाचा परिसर प्रभावित झाला आहे.
अमेरिकेतील मिसिसिपी (Mississippi) प्रदेशात आलेल्या भयानक चक्रीवादळामुळे (Tornado) आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या चक्रिवादळामुळे अनेक जण बेपत्ता झाले असून शेकडो लोक बेघर देखील झाले आहेत.या वादळात सुमारे 100 मैलाचा परिसर प्रभावित झाला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सध्या बचावमोहिम ही युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. प्रभावित झालेल्या लोकांसाठी आणखी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सुविधा वाढवत आहोत. शोधमोहिम आणि बचावकार्य केलं जात आहे.
पहा व्हिडिओ
मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रीव्ह्स यांनी ट्विटरवर लिहिले, "काल रात्रीच्या हिंसक चक्रीवादळामुळे किमान तेवीस मिसिसिपियन लोकांचा मृत्यू झाला आहे." "आम्हाला माहित आहे की आणखी बरेच जण जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव पथके अजूनही सक्रिय आहेत" शोध आणि बचाव पथके सिल्व्हर सिटी आणि रोलिंग फोर्कमध्ये वाचलेल्या लोकांचा शोध हा घेतला जात आहे.
या घटनेनंतर अर्लट देखील जारी करण्यात आला आहे. पुन्हा या परिसरात चक्रीवादळामुळे नुकसान होण्याची शक्यत देखील वर्तवण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी वारंवार हवामान विभागाच्या अपडेटवर लक्ष्य ठेवण्यास सांगितले आहे. सध्या सुरु असलेल्या बचाव कार्यात देखील यामुळे अडथळे येण्याची शक्यता असून सध्या सुरु असलेले बचाव कार्य हे वेगाने करण्यावर प्रशासनाचे लक्ष्य आहे. अनेक झाडे आणि इमारती कोसळल्यामुळे त्यांच्याखाली कोणी अडकले नाही ना याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे. तसेच प्रभावित झालेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत पोहचवली देखील जात आहे.