TIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी

दरम्यान नेत्यांसोबतच 2020 वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये बॉलिवूड स्टार, अभिनेता आयुषमान खुराना याचादेखील समावेश झाला आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

अमेरिकेच्या टाईम मासिकाकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणार्‍या 100 प्रभावशाली व्यक्तीची यादी आता प्रसिद्ध झाली आहे. कलाकार मंडळी, नेते, संस्थापक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यामध्ये समावेश असतो. अशात आता यंदाच्या जगातील प्रभावी नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा देखील समावेश झाला आहे. दरम्यान या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), कमला हॅरिस ( Kamala Harris), जो बायडन (Joe Biden) यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 2015, 2016 आणि 2017 साली देखील प्रभावी नेत्यांच्या यादीमध्ये स्थान मिळवले होते. या यादीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष  Xi Jinping यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान नेत्यांसोबतच 2020 वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये बॉलिवूड स्टार, अभिनेता आयुषमान खुराना याचादेखील समावेश झाला आहे. दरम्यान यंदाच्या यादीमध्ये आयुषमान हा एकमेव बॉलिवूड अभिनेता प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीमध्ये मान मिळवण्यास यशस्वी ठरला आहे. इथे पहा संपूर्ण यादी

संस्थापक

कलाकार

आयकॉन्स

टायटन

नेते मंडळी

यंदा पहिल्यांदाच टाईम मासिकाकडून प्रभावशाली व्यक्तींची यादी सादर करताना त्याचा ABC चॅनेलवर तासभराचा एक कार्यक्रम सादर करण्यात आला आहे.  23, 24 आणि 25 सप्टेंबर दिवशी यंदाच्या प्रभावी 100 व्यक्तींचा एक टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पुढील  3 दिवसांत टप्प्याटप्प्याने ही मंडळी व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारा संवाद साधणार आहेत.