One Lakh Cockroaches in House: महिलेने घरात पाळले 1 लाखांहून अधिक झुरळे! पुढं काय झालं? वाचा
अग्निशमन दलाचे जवान जेव्हा महिलेच्या घरात घुसले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महिलेने घरात एक लाख झुरळे, 150 पक्षी, सात कासव, तीन साप, 118 ससे आणि 15 मांजरी ठेवली होती.
One Lakh Cockroaches in House: काही लोकांना कुत्रे आणि मांजर पाळण्याची शौक असतो. तर अनेकांना सशासारखे प्राणी पाळण्याचे शौक असतो. सध्या एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात या महिलेने आपल्या घरात झुरळे पाळल्याचं समोर आलं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या महिलेने आपल्या घरात 100-200 नव्हे तर एक लाखापेक्षा जास्त झुरळ ठेवले होते. याशिवाय महिलेने इतर 300 जनावरेही घरात कोंडून ठेवली होती. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला.
महिलेच्या घरात आढळले 300 हून अधिक प्राणी -
या अमेरिकन महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 51 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, महिलेच्या घरातील एका रुग्णाने चुकून फायर अलार्म लावला होता. यानंतर अग्निशमन दलाचे वाहन महिलेच्या घरी पोहोचले. त्यावेळी ही महिला तिच्या घरी काही रुग्णांना भेटत होती. अग्निशमन दलाचे जवान जेव्हा महिलेच्या घरात घुसले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महिलेने घरात एक लाख झुरळे, 150 पक्षी, सात कासव, तीन साप, 118 ससे आणि 15 मांजरी ठेवली होती. (हेही वाचा - Toshakhana Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan यांना निवडणूक आयोगाचा झटका; तोशाखाना प्रकरणात ठरवण्यात आले अपात्र)
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या घरातील हवा इतकी हानिकारक होती की कोणीही आत जाऊ शकत नव्हते. यामुळे बचाव पथकाला हेझ-मॅट सूट घालावा लागला. या महिलेच्या घराच्या सर्व मजल्यावर लघवी आणि विष्ठा होती. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. दुसरीकडे, महिलेच्या मित्रांचे म्हणणे आहे की, तिला प्राण्यांची खूप आवड होती. त्यामुळे तिचे मित्र तिला प्रेमाने 'स्नो व्हाइट' म्हणत.
या महिलेच्या मित्रांचे असे म्हणणे आहे की, तिला एखादा प्राणी बेघर दिसला की ती त्याला आपल्या घरी आणायची. कारण तिला कोणताही प्राणी बेघर होऊ द्यायचा नव्हता. त्याच वेळी, महिलेचे म्हणणे आहे की, तिने आपले सर्व पैसे प्राण्यांना चांगले घर देण्याच्या प्रयत्नात खर्च केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)