अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,258 कोरोना बाधितांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या 51,017 वर

अमेरिकेत कोरोना बाधितांची एकूण संख्या 9,25,038 पोहोचली असून त्यापाठोपाठ स्पेनमध्ये ही संख्या 2,19,764 वर पोहोचली आहे

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

जगभरात कोरोना व्हायरस ने अक्षरश: थैमान घातले असून अमेरिकेत तर मृत्यूचे तांडव सुरु केले आहे. अमेरिकेत शुक्रवारी 1258 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ही आकडेवारी मागील 3 आठवड्यांतील सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी दिली असून अमेरिकेत कोरोना बाधित मृतांची एकूण संख्या 51,017 इतकी झाली आहे. ही माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे. जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 28,30,051 इतकी झाली असून 1,97,245 इतकी मरण पावले आहे.

अमेरिकेत कोरोना बाधितांची एकूण संख्या 9,25,038 पोहोचली असून त्यापाठोपाठ स्पेनमध्ये ही संख्या 2,19,764 वर पोहोचली आहे. Coronavirus Drug: कोरोना व्हायरसची पहिली लस Remdesivir ट्रायलमध्ये ठरली अपयशी; WHO च्या अहवालातून खुलासा

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 24,506 वर पोहोचली असून 5063 रुग्ण बरे झाले आहेत. तर 775 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) नवे 357 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4589 वर पोहचला. पुणे मंडळात एकूण 1020 रुग्ण झाले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रात (Maharashtra) आज 394 नवीन कोरोन व्हायरसचे रुग्ण व 18 मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 6817 व मृतांचा एकूण आकडा 310 झाला आहे. आजपर्यंत एकूण 957 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.