Subway's Mini Sandwich: पाकिस्तानतली परिस्थिती इतकी वाईट की सबवेला सँडविचचा आकार करावा लागला कमी

सबवेने पाकिस्तानमधील सँडविचचा आकार 3 इंचापर्यंत कमी केला आहे. त्याचे कारण म्हणजे सँडविच लहान असल्याने त्याची किंमत कमी असेल आणि लोकांना ते कमी किमतीत खरेदी करता येईल.

Subway's Mini Sandwich: पाकिस्तानतली परिस्थिती इतकी वाईट की सबवेला सँडविचचा आकार करावा लागला कमी
Subway

पाकिस्तान आजवरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी दयनीय आहे की कधी पीठ-डाळीसाठी तर कधी पेट्रोल-डिझेलसाठी लोकांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या येत आहेत. या मालिकेत आणखी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील महागाईचा सामना करण्यासाठी सबवेने आपल्या सँडविचचा आकार कमी केला आहे. सबवेने पहिले ३ इंच मिनी सँडविच लाँच केले.

सबवेने पाकिस्तानमधील सँडविचचा आकार 3 इंचापर्यंत कमी केला आहे. त्याचे कारण म्हणजे सँडविच लहान असल्याने त्याची किंमत कमी असेल आणि लोकांना ते कमी किमतीत खरेदी करता येईल. सबवेने सँडविचची मिनी व्हर्जन लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2023 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).