Sri Lanka मध्ये PM Mahinda Rajapaksa यांच्या मंत्रिमंडळातील सार्यांचा राजीनामा; राजपक्षे पंतप्रधानपदी कायम राहणार
वाढत्या सार्वजनिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राजपक्षे यांनी शुक्रवारी ( 1 एप्रिल) उशिरा देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली होती.
श्रीलंका (Sri Lanka) सध्या सर्वात वाईट आर्थिक मंदी अनुभवत असताना आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवार 3 एप्रिलच्या रात्री श्रीलंकेच्या कॅबिनेटने आपला राजीनामा दिला आहे. मंत्री Dinesh Gunawardena यांनी सार्या मंत्रिमंडळाने त्यांचा राजीनामा पंतप्रधान Mahinda Rajapaksa यांच्याकडे सुपूर्त केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान एकाच वेळी सार्यांनी राजीनामा देण्यामागील स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतू राजपक्षे वगळता मंत्रिमंडळातील सार्या 26 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये राजपक्षे यांचा मुलगा Namal Rajapaksa यांचाही समावेश असून त्याने ट्विट करत माहिती देताना पक्षासाठी, मतदारांसाठी काम करत राहीन असं म्हटलं आहे.
वाढत्या सार्वजनिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राजपक्षे यांनी शुक्रवारी ( 1 एप्रिल) उशिरा देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली होती. सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्थेचे संरक्षण आणि पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात विरोध सुरू करण्यात आला होता. त्याला सरकारने 36 तासांचा कर्फ्यू लागू करून प्रत्युत्तर दिले. संध्याकाळपासून, अफवा पसरत आहेत की राजपक्षे हे आर्थिक संकट हाताळण्यासाठी अंतरिम सरकार निवडू शकतात. आज सकाळी श्रीलंकेमधील कर्फ्यू उठवण्यात आला आहे.
श्रीलंकेतील राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार, foreign exchange reserve च्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला सरकारच्या कथित "चुकीच्या" वागणुकीमुळे मंत्री जनतेच्या तीव्र दबावाखाली आले आहेत.