IPL Auction 2025 Live

South Africa: महिलेने जन्म दिला चक्क 60 वर्षांची म्हातारी दिसणाऱ्या बाळाला; कुटुंबीय झाले स्तब्ध, जाणून घ्या काय आहे प्रकरण

परंतु दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) एका कुटुंबाचा हा आनंद तेव्हा मावळला, जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची जन्माला आलेली मुलगी ही चक्क साठ वर्षांच्या वृद्ध स्त्रीसारखी दिसत आहे

Progeria (संग्रहित संपादित प्रतिमा)

मूल जन्माला आल्यावर कोणत्याही कुटुंबात उत्सवाचे, आनंदाचे वातावरण निर्माण होते. परंतु दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) एका कुटुंबाचा हा आनंद तेव्हा मावळला, जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची जन्माला आलेली मुलगी ही चक्क साठ वर्षांच्या वृद्ध स्त्रीसारखी दिसत आहे. या मुलीचा चेहरा पाहून कुटुंबीय भयभीत झाले. मात्र त्यानंतर त्यांना समजले की, त्यांची मुलगी एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे, तेव्हा त्यांनी तिला चांगल्या डॉक्टरांकडे नेले. एका वृत्तानुसार, ही घटना दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर्न केप या छोट्या शहरातील आहे.

‘द सन’ने याबाबत वृत्त दिले आहे. या ठिकाणी 30 ऑगस्ट रोजी 20 वर्षीय महिलेने सुईणीच्या मदतीने घरी एका मुलीला जन्म दिला. पण मूल जन्माला येताच तिला पाहून आई आणि सुईण दोघीही घाबरल्या. त्यानंतर, जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी तिला पाहिले, तेव्हा तेही स्तब्ध झाले. मुलीचे हात विचित्र होते आणि तिच्या त्वचेवर सुरकुत्या दिसत होत्या. त्यांनी ताबडतोब मुलीला आणि आईला रुग्णालयात नेले. जिथे त्यांना  कळले की त्यांच्या मुलीला Progeria, नावाचा दुर्मिळ आजार आहे.

या आजाराने ग्रस्त व्यक्तीचे वय मुळच्या वयापेक्षा अनेक पटने अधिक दिसू लागते. सध्या मुलीला आणि तिच्या आईला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. हा आजार म्हणजे बेंजामिन बटण (Benjamin Button) स्थिती असून, त्याला हचिन्सन-गिलफोर्ड सिंड्रोम (Hutchinson-Gilford Syndrome) देखील म्हणतात। हा एक जेनेटिक रोग आहे. या प्रकारच्या सिंड्रोममध्ये, मुलाचे केस गळतात आणि त्याच वेळी त्याची वाढ देखील थांबते आणि यामध्ये मुलाच्या मृत्यूची शक्यता देखील 100%असते.

अशा मुलांचे सरासरी आयुर्मान 14.5 वर्षे असते. Progeria Research Foundation अंदाज आहे की जगभरात 132 मुले आणि प्रौढांना हचिन्सन-गिलफोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम आहे. सध्या तरी या आजारावर कोणताही इलाज नाही, परंतु हृदय आणि रक्तवाहिनीसंबंधी रोगाचे नियमित निरीक्षण आपल्या मुलाची स्थिती आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करू शकते.