Sexual Stamina: पाकिस्तानमध्ये Viagra वर बंदी; लैंगिक स्टॅमिना वाढवण्यासाठी पुरुष वापरत आहे सरड्याची चरबी व विंचूचे तेल, जाणून घ्या सविस्तर
एएफपीशी बोलताना राजा बाजारच्या एका दुकानदाराने सांगितले की, या तेलाचे फक्त 5 थेंब लावले तर ते चमत्कार घडवेल
पाकिस्तानची (Pakistan) अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाई आणि कर्जाने त्रस्त असलेल्या या देशात लोकांच्या जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. देशातून दररोज विचित्र प्रकरणे समोर येत आहेत, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अलीकडची बातमी पाकिस्तानी पुरुषांबद्दलची आहे. देशातील पुरुष स्वतःची लैंगिक शक्ती (Sexual Power) आणि ताकद वाढवण्यासाठी सरडे, विंचू यांची चरबी व तेल (Lizard Fat) वापरत आहेत.
एएफपीच्या रिपोर्टनुसार, जेव्हापासून पाकिस्तानमध्ये व्हायग्रा बंद झाला आहे, तेव्हापासून येथील पुरुष स्टॅमिना वाढवण्यासाठी सरड्याचा वापर करत आहेत. सरडा, पाल, यांची चरबी वापरून त्यांचे पुरुषत्व वाढवत आहेत.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान येथे सॅन्डा लिझार्ड (Sanda Lizard) मोठ्या प्रमाणात मारले जात असून त्याची चरबी, विंचूचे तेल आणि लाल मिरचीचे मिश्रण करून हे तेल तयार केले जात आहे. हे तेल आवश्यक ठिकाणी लावल्यास पुरुषत्व प्राप्त केले जाऊ शकते असे इथल्या पुरुषांचे मत आहे. रावळपिंडीच्या बाजारमध्ये हा व्यवसाय जोरात सुरू असून रस्त्याच्या कडेला अशा प्रकारच्या तेलाची विक्री करणारे अनेक लोक आढळून येत आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार, विक्रीदार खरेदीदारासमोर चाकूने सरडा कापतो आणि आतून चरबी काढतो, जेणेकरून खरेदीदाराची खात्री होईल की त्याला जे तेल मिळत आहे ते शुद्ध आहे. एएफपीशी बोलताना राजा बाजारच्या एका दुकानदाराने सांगितले की, या तेलाचे फक्त 5 थेंब लावले तर ते चमत्कार घडवेल आणि पुरुषांना व्हायग्रासारख्या औषधांची गरज भासणार नाही. हे दुकानदार मोठमोठे दावे करतात, जे ऐकून लोक हे तेल विकत घेत आहेत.
या तेलाची एक कुपी बाजारात 600 ते 1200 रुपयांना मिळते, त्यात केवळ 100 ते 150 मि.ली. तेल असते. सरड्याचे तेल सांधेदुखी, पाठदुखी आणि केसगळतीवरही गुणकारी असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानमध्ये महागाईच्या काळात योग्य उपचारांचीही समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लोक महागड्या डॉक्टरांकडे जाण्याऐवजी बाबा-हकीमकडे जात आहेत. (हेही वाचा: Rape of Corpses: पाकिस्तानमध्ये कबरी खोदून मृतदेहांवर बलात्कार; मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत पालक)
परंतु या तेलाचा वापर करून लैंगिक शक्ती वाढवण्याचा दावा हा एक भ्रम आहे आणि त्याला ना विज्ञानाने पुष्टी दिली आहे ना डॉक्टरांनी. एएफपीशी बोलताना इस्लामाबादचे डॉक्टर अहमद शहाब यांनी स्पष्ट केले की, या तेलाचा कोणताही परिणाम होत नाही आणि हा केवळ लोकांचा गैरसमज आहे. यातून केवळ जनतेची फसवणूक केली जात आहे.