Sex Service in Pak Railway: 'एसी क्लासमध्ये सेक्स सेवा उपलब्ध'; पाकिस्तान रेल्वेच्या तिकीटावरील मजकूर पाहून प्रवाशांना धक्का, जाणून घ्या सविस्तर
या हॅकिंगमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नुकतेच पाकिस्तानमध्ये (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझसह अनेक नेते आणि पंतप्रधान कार्यालयातील ऑडिओ लीक झाले होते. त्यानंतर आता देशातील रेल्वे (Pakistan Railways) तिकीट प्रणाली हॅक करण्यात आली आहे. पाकिस्तानची तेल्वे तिकीट प्रणाली हॅक करून हॅकरने तिकिटावर छापलेला मजकूर बदलला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी (30 सप्टेंबर 2022) हॅकरने रेल्वे तिकीट प्रणाली हॅक केली. यानंतर तिकिटावर 'एसी क्लासमध्ये सेक्स सेवा उपलब्ध आहे' असे छापण्यात आले. रेल्वेकडून अशा मजकुराची तिकिटेही लोकांना देण्यात आली. रेल्वेकडून प्रदान होत असलेली ही 'सुविधा' पाहून ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी थक्क झाले. तिकीटावरील हा मजकूर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिकीट बुकिंग कार्यालयात गोंधळ घातला.
प्रवाशांनी रेल्वे तिकीट व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिल्यानंतर, रेल्वेने तिकीट प्रणालीत सुधारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, जोपर्यंत रेल्वेकडून ही चूक निस्तरली जावी, तो पर्यंतच पाकिस्तान रेल्वेचे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर थाल एक्स्प्रेसच्या अधिकाऱ्यांनी डीएसपी रेल्वे रावळपिंडी यांना अर्ज सादर केला आहे. त्यांचे सॉफ्टवेअर हॅक झाल्याचे या अॅप्लिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. (हेही वाचा: Petrol Prices: पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, डिझेल दरात कोणताही बदल नाही; सविस्तर वृत्त)
थाल एक्स्प्रेसच्या अधिकाऱ्यांनी डीएसपींना अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हॅकिंगमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, तिकिटावर नमूद केलेल्या मजकुराचे कारण म्हणजे, काल थल एक्सप्रेसची तिकीट प्रणाली हॅक झाली होती. ही यंत्रणा खासगी कंत्राटदाराकडे आहे.