UN Security Council Committee: दहशतवादाबाबत UNSC समितीची आज दुसरी बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला
ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर, निधी उभारणीसाठी नवीन पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनसारख्या मानवरहित हवाई उपकरणांशी व्यवहार करण्यावर चर्चा केली जाईल. या समितीची पहिली बैठक मुंबईत झाली.
UN Security Council Committee: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी (Terrorism) समितीच्या विशेष बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत तीन मुद्यांवर आधारित अजेंड्यावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर, निधी उभारणीसाठी नवीन पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनसारख्या मानवरहित हवाई उपकरणांशी व्यवहार करण्यावर चर्चा केली जाईल. या समितीची पहिली बैठक मुंबईत झाली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ही बैठक दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत होणार आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. आदल्या दिवशीही मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बैठक झाली. यादरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांच्या राजदूतांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. आजच्या बैठकीत चीनचे राजनैतिक अधिकारीही सहभागी होणार आहेत. (हेही वाचा - Cyber and Financial Crimes: राज्यातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल; Devendra Fadanvis यांची माहिती)
पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका दाखवली होती. त्यांनी चीन आणि पाकिस्तानवर ताशेरे ओढताना म्हटलं होत की, 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि मानवतेला गंभीर धोका आहे. अपघातग्रस्तांचे नुकसान अपरिमित आहे. दहशतवादाच्या गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. दहशतवादी हल्ले अस्वीकार्य आहेत.'
दपम्यान, परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे बोलताना म्हणाले की, 'मला पाच मुद्द्यांकडे लक्ष वेधायचे आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिकदृष्ट्या रोखण्यासाठी पावले उचलली जावीत, आर्थिक मदत करणाऱ्या देशावर निर्बंध लादले जावेत, दहशतवादाबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. दहशतवादी गट नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्यांना पकडण्याची गरज आहे.