रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin जानेवारी 2021 मध्ये करणार पदत्याग; Parkinson आजाराने त्रस्त- Reports
राष्ट्रपती पार्किन्सन या आजाराने त्रस्त असल्यामुळे 2021 च्या जानेवारी मध्ये पदत्याग करणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्रपती (Russian President) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे राष्ट्रपती पद सोडण्याच्या विचारत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. राष्ट्रपती पार्किन्सन (Parkinson) या आजाराने त्रस्त असल्यामुळे 2021 च्या जानेवारी मध्ये पदत्याग करणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुतिन यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांना कुटुंबियांकडून सांगण्यात येत असल्याचे रिपोर्ट्समधून समोर येत आहे. (व्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत)
मीडिया रिपोर्टनुसार, 68 वर्षीय व्लादिमीर पुतिन यांना प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी पदत्याग करण्यास सांगितले जात आहे. पुतिन यांची 37 वर्षीय गर्लफ्रेंड अलिना काबाएवा (Alina Kabaeva) आणि त्यांच्या दोन मुली त्याच्यावर पदाचा राजीनामा देण्यास दबाव आणत आहेत, असे न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी सांगितले आहे.
सोलोवे पुढे म्हणाले, एक कुटुंब आहे, त्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. जानेवारीत त्याच्या हस्तांतरणाची योजना सार्वजनिक करण्याचा त्यांचा मानस आहे. तसंच पुतीन हे पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त असून अलिकडेच त्यांच्यात या आजाराची लक्षणे दिसून आली होती, असेही सोलोवे यांनी सांगितले.
निरीक्षकांनी पुतीन यांच्या अलिकडेच्या फुटेजचा अभ्यास केला आहे. त्यातून असे दिसून आले की, त्यांचे पाय सतत हालचाल करत असतात आणि खुर्चीच्या आर्मरेस्टला टेकवताच त्यांच्यात वेदना जाणवू लागतात. तसंच त्यांना पेन पकडणेही शक्य नसल्याचे द युएस सन च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या नुसार, पुतीन लवकरच नवीन पंतप्रधान नियुक्त करतील, असे सोलोवे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुतीन यांच्या पद सोडण्याच्या योजना या अफवा असल्याचे राष्ट्रपतींच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.