Indian Embassy in Ukraine: 'काहीही करा पण तातडीने Kharkiv सोडा', भारतीय दुतावासाची युक्रेनमधील नागरिकांना सूचना
युक्रेनमध्ये (Ukraine) अनेक भारतीय अडकले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाने या नागरिकांना सूचना दिल्या आहेत. काही ही करा पण खारकीव (Kharkiv) सोडा. होऊ शकते की तुम्हाला कदाचित वाहन मिळू शकणार नाही. पण, साधनांची वाट न पाहता वेळ पडल्यास पायी चालत निघा पण खारकीव शहरातून बाहेर पडा.
युक्रेनमध्ये (Ukraine) अनेक भारतीय अडकले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाने या नागरिकांना सूचना दिल्या आहेत. काही ही करा पण खारकीव (Kharkiv) सोडा. होऊ शकते की तुम्हाला कदाचित वाहन मिळू शकणार नाही. पण, साधनांची वाट न पाहता वेळ पडल्यास पायी चालत निघा पण खारकीव शहरातून बाहेर पडा. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरु आहे. त्यामुळे भारतीय दुतावासाने 'इंडिया इन युक्रेन' (India in Ukraine) ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे की, 'एक महत्त्वपूर्ण सूचना.. आपल्या सुरक्षेसाठी शक्य तितक्या लवकर खारकीव सोडा. शक्य तितक्या लवकर पोसोचिन, बाबाये आणि बेजलियुडोवकाच्या दिशेने निघा. नागरिकांनी या ठिकाणी युक्रेनच्या वेळेनुसार 1800 वाजेपर्यंत (भारती प्रमाणवेळेनुसार पहाटे 6.00 ) पोहोचणे आवश्यक आहे.'
आणखी एका सूचनेत भारतीय दुतावासाने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये असलेल्या ज्या विद्यार्थी, नागरिकांना निश्चित ठिकाणी परतण्यासाठी रेल्वे, वाहन अथवा इतर साधने मिळणार नाहीत त्या विद्यार्थ्यांनी पायी चालत पेसोचिन (11 किमी), बाबाये (12 किमी) आणि बेजलियुडोवका (16 किमी) या ठिकाणांच्या दिशेने पोहोचायचे आहे. युक्रेनियन प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता इथपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या परिसरात सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्याच समस्या आहेत. दरम्यानच्या काळात भारत सरकारने या सूचना जारी केल्या आहेत.
खारकीवमध्ये रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव सुरु केला आहे. या हल्ल्यात नवीन शेखरप्पा नामक एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये खारकीव रेल्वे स्ठेशनवर उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दावा केला आह की, त्याला ट्रेनमधून खाली उतरवले होते. या विद्यार्थ्यांचे म्हणने असे की, ट्रेन स्टेशनवर आली आणि निघूनही गेली. मात्र, त्यांना ट्रेनमध्ये चढूच दिले गेले नाही. खारकीव येथे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर बर्फवर्षाव होतो आहे. त्यामुळे उघड्यावर असलेले भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक थंडीने कुडकुडत आहेत. (हेही वाचा, Russia-Ukraine War: तिसरे महायुद्ध झाल्यास अन्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाचा इशारा, जग चिंतेत)
ट्विट
रशिया सातत्याने युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहे. युक्रेनमधील हालत दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालली आहे. त्यामुळे भारत सरकारचा प्रयत्न आहे की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढले जाईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी आज म्हटले की, भारतात पाठीमागील 24 तासांमध्ये युद्धग्रस्त युक्रेनमधून 1377 नागरिकांना बाहेर काढण्यात आहे. आतापर्यंत 1377 नागरिक भारतात दाखलही झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)