Russia-Ukraine War: युक्रेनमधील कीव येथे एका भारतीय विद्यार्थ्यी गोळीबारात जखमी, वीके सिंह यांची माहिती
त्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी आणण्यात यशही मिळाले आहे.
रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी आणण्यात यशही मिळाले आहे. दरम्यान, युक्रेनमधील कीव (Kyiv) येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) राज्य मंत्री (MoS) जनरल वीके सिंह (VK Singh) यांनी दिली आहे. त्यांनी पोलंडच्या रेजजो विमानतळावर ही माहिती दिली.
जनरल (सेवानिवृत्त) वीके सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, कीव येथे एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली होती. त्याला तातडीने कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाने स्पष्ट केले की सर्वांना कीव येथे सोडण्यात यायला हवे होते. युद्धाच्या स्थितीत झालेला गोळीबार हा कोणत्याही व्यक्तीचा धर्म अथवा राष्ट्रीयत्व पाहात नाही. (हेही वाचा, Russia-Ukraine War: आतापर्यंत 18 हजार भारतीयांनी युक्रेन सोडल्याची पराराष्ट्र मंत्रालयाची माहिती)
ट्विट
युक्रेनमध्ये युद्ध शिगेला पोहोचल्याने विद्यार्थी आणि विदेशी नागरिक युक्रेन सोडून दुसरीकडे जात आहेत. भारतीयांप्रमाणेच युक्रेनमधील प्रत्येक विद्यार्थी (विदेशी) आपल्या मायदेशी परतण्यास प्रयत्न करत आहे. भारताने विदेशात अडकेल्या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी चार मंत्र्यांवर जबाबदारी दिली आहे. यात केंद्रीय मंत्री, हरदीप सिंह पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (सेवानिवृत्त) वीके सिंह यांचा समावेश आहे. हे चारही मंत्री युक्रेनच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.