Ray Kurzweil On Humans Immortality: काय सांगता? 2030 पासून मानव होऊ शकत अमर! गुगलच्या माजी अभियंत्याच्या दाव्याने जग हैराण

कुर्झवील यांनी दावा केला आहे की, सन 2030 पर्यंत मानला अमरत्व (Ray Kurzweil On Humans Immortality) प्राप्त करण्याची शक्ती मिळालेली असेल. म्हणजेच साधारण 2030 पासून माणूस अमरत्व प्राप्त करु शकेल. म्हणजेच मानवाचा मृत्यूच होणार नाही, अशी स्थिती असू शकेल.

Ray Kurzweil | (File Image)

'अश्वत्थामा' (Ashwatthama) अमर असल्याचे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आणि पुरानांमध्ये, महाभारतांमधील कथांमध्ये वाचत आलो आहोत. पण, मानव अमर (Humans Immortality) असल्याचे कधी ऐकले आहे काय? किंवा लवकरच मानवाला अमरत्व मिळे असे कोणी म्हटले तर तुम्ही विश्वास ठेवाल काय? तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. पण, असा दावा मात्र करण्यात आला आहे. हा दावा केला आहे संगणक शास्त्रज्ञ आणि लेखक, जे गुगलचे माजी अभियंता असलेल्या रे कुर्झवील (Ray Kurzweil) यांनी. कुर्झवील यांनी दावा केला आहे की, सन 2030 पर्यंत मानला अमरत्व (Ray Kurzweil On Humans Immortality) प्राप्त करण्याची शक्ती मिळालेली असेल. म्हणजेच साधारण 2030 पासून माणूस अमरत्व प्राप्त करु शकेल. म्हणजेच मानवाचा मृत्यूच होणार नाही, अशी स्थिती असू शकेल.

रे कुर्झवील हे सद्या 75 वर्षांचे आहेत. पंचाहत्तर वर्षीय या संगणक तज्ज्ञाने या आधीही अनेकदा विविध भविष्यवाण्या केल्या आहेत. अलिकडच्या दशकामध्ये वर्तवलेल्या गेलेल्या अनेक भविष्यवाण्यांती महत्त्वाच्या भविष्यवाण्यांमधील एक भविष्यवाणी म्हणून रे कुर्झवील यांच्या भविष्यवाणीकडे पाहिले जात आहे. रे कुर्झवील यांना1999 मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी आणि 2022 मध्ये नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या 75 वर्षीय संगणक शास्त्रज्ञाने केलेल्या या भविष्यवाणीनंतर जगाचे लक्ष वेधले गेले आहे. (हेही वाचा, Earnings From ChatGPT: चॅट जीपीटीद्वारे 23 वर्षीय तरुणाने 3 महिन्यात कमावले 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे)

टेक व्लॉगर अडाजिओच्या दोन-भागांच्या YouTube मालिकेत Kurzweil चे दावे संकलित करण्यात आले आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ लक्षावधी लोकांनी पाहिला आहे. सोबतच रे कुर्झवील यांच्या “द सिंग्युलॅरिटी इज नियर” या 2005 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातही त्यांनी तंत्रज्ञान मानवांना 2023 पर्यंत अमरत्व प्राप्त करण्यास अनुमती देईल, असे म्हटले होते. या पूस्तकाचा दाखला देत न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले होते.

दरम्यान, आपल्या दाव्याची पनरावृत्ती करत त्यांनी म्हटले आहे की, 2030 पर्यंत तंत्रज्ञानामुळे मानवाला सार्वकालिक जीवन मिळू शकेल. रे कुर्झवील यांनी पुढे असेही म्हटले की, सध्याची प्रगती आणि आनुवंशिकी, रोबोटिक्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये झालेला विस्तार नजीकच्या भविष्यात नॅनोरोबॉट्सना आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहू देईल.