Rape of Corpses: पाकिस्तानमध्ये कबरी खोदून मृतदेहांवर बलात्कार; मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत पालक (See Photos)
पण हे सर्व नेक्रोफिलिया या आजारामुळे झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानमध्ये लैंगिक गुन्हे (Sexual Crimes in Pakistan) दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या ठिकाणी मुली जिवंतपणी तर नाहीच मात्र मृत्यूनंतरही सुरक्षित नसल्याचे दिसून येते. पाकिस्तानमध्ये मृतदेहांसोबत बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत मृत मुलींच्या कबरींना लोखंडी दरवाजे आणि कुलूप लावण्यात येत आहेत.
पाकिस्तानात दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार होतो. मृत्यूनंतरही लोक मृतदेहावर बलात्कार करत आहेत. त्यामुळे मुलींचे पालक आपल्या मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत. कबरीला कुलूप लावणे ही संपूर्ण पाकिस्तानसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. माजी मुस्लिम व आताचे निरीश्वरवादी कार्यकर्ते आणि 'द कर्स ऑफ गॉड, व्हाय आय लेफ्ट इस्लाम' या पुस्तकाचे लेखक, हॅरिस सुलतान असे मानतात की निर्वासन आणि बलात्कार हे कट्टर इस्लामी विचारसरणीचे परिणाम आहेत .
हॅरिस सुलतानने ट्विट करत एका थडग्याचा फोटो शेअर केला असून त्यावर कुलूप लावण्यात आल्याचे दिसते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे जेथे लोक त्यांच्या मृत मुलींना बलात्कारापासून वाचवण्यासाठी त्यांच्या कबरींना कुलूप लावत आहेत. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा ही मानसिकता तुम्हाला थडग्यात घेऊन जाते.’ एएनआयने डेली टाईम्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये मृतदेहांसोबत क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
पाकिस्तानमध्ये मृतदेहांसोबत बलात्काराचे एक धक्कादायक प्रकरण 2011 मध्ये समोर आले होते. कबरीचे रक्षण करणार्या मोहम्मद रिझवानला कबरीमधून मृतदेह बाहेर उकरून काढून त्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रिजवानने 48 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याची कबुली दिली होती. असाच एक प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये समोर आला होता. त्यावेळी एका 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला होता. रफिक असे बलात्कार करणाऱ्याचे नाव आहे. ज्या रात्री मुलीचे दफन करण्यात आले, त्याच रात्री रफिकने तिची कबर खोदून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तिला अर्धा किलोमीटर दूर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा: Shocking: डोअरबेल प्रँक करणाऱ्या तीन अमेरिकन अल्पवयीन मुलांची हत्या; कोर्टाने भारतीय वंशाच्या व्यक्तीला ठरवले दोषी)
पाकिस्तानातील मृतदेहांवर बलात्कारासाठी इस्लामिक कट्टरतावादी विचारसरणीला जबाबदार धरले जाते. पण हे सर्व नेक्रोफिलिया या आजारामुळे झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. या आजारामुळे मृत शरीरावर बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होते. वास्तविक, ग्रीक भाषेत नेक्रो म्हणजे मृत शरीर आणि फिलिया म्हणजे प्रेम. अशा प्रकारे 'नेक्रोफिलिया' म्हणजे मृत व्यक्तींशी प्रेम करणे किंवा लैंगिक संबंध ठेवणे.