Bangladesh Protest: सरकारविरोधी निदर्शनात आंदोलकांकडून 'लाँग मार्च टू ढाका'चे आयोजन; आत्तापर्यंत 100 जाणांचा मृत्यू

तेथे आत्तापर्यंत 100 नागरिकांनी जीव गमावला असून असंख्य जखमी झालेत. सोमवारी निदर्शकांनी सामान्य जनतेला 'लाँग मार्च टू ढाका' मध्ये सामील होण्याचे आवाहन केले. परिणामी तणावपूर्ण वातावरण निर्माण हेण्याची शक्यता आहे.

(Photo Credits: X/@TheDavidBergman)

Bangladesh Protest: पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina)यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी निदर्शकांनी सामान्य जनतेला 'लाँग मार्च टू ढाका' मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बांगलादेशात आणखी तणावपूर्ण परिस्थीती (Bangladesh Violence)निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या कोटा पद्धतीवरून हसिना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनच्या बॅनरखाली असहकार कार्यक्रमात सहभागी झालेल्या आंदोलकांना सत्ताधारी अवामी लीग, छात्र लीग, यांच्या समर्थकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. (हेही वाचा: Bangladesh Protests: बांगलादेशमध्ये हिंसाचारात 72 जणांचा मृत्यू, असंख्य जखमी; सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू(Watch Video))

या दरम्यान, रविवारी सकाळी मारहाणीची घटना समोर आली. रविवारी झालेल्या चकमकींमध्ये 14 पोलिसांसह 100 लोकांचा मृत्यू झाला, असे बंगाली भाषेतील अग्रगण्य वृत्तपत्र प्रथम आलोने यांनी वृत्त दिले आहे. हिंसाचारामुळे देशात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय, अनिश्चित काळासाठी देशव्यापी कर्फ्यू लागू लगावण्यात आला आहे. विद्यार्थी आंदलनाने नियोजित वेळेआधी एक दिवस सोमवारी लाँग मार्च ते ढाका ला सुरूवात केली आहे. (हेही वाचा: Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला, विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले)

भारत सरकारनंही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच, येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे. देशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे आंदोलनाचे समन्वयक आसिफ महमूद यांनी रविवारी रात्री सांगितले आहे. “परिस्थितीचा आढावा घेण्याच्या तातडीच्या निर्णयात, 'मार्च टू ढाका' कार्यक्रम 5 ऑगस्टला ठेवण्यात आला. देशभरातील विद्यार्थ्यांना सोमवारी ढाका येथे येण्याचे आवाहन करत आहोत. " असे त्यांनी म्हटले.

'ही शेवटची लढाई आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी या ऐतिहासीक लढाईचा भाग होण्यासाठी ढाका येथे यावे, विद्यार्थी एक नवीन बांगलादेश तयार करतील,' असेही आंदोलक समन्वयक आसिफ महमूद यांनी पुढे म्हचले. अवामी लीगची सोमवारची नियोजित शोक मिरवणूक कर्फ्यूमुळे रद्द करण्यात आली आहे. चालू असलेल्या हिंसाचारामुळे भारताने आपल्या सर्व नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.