Prince Philip Passes Away: ब्रिटनवर पसरली शोककळा; Queen Elizabeth II चे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन
ब्रिटनची राणी एलिझाबेथ II चे (Queen Elizabeth II) पती प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचे निधन झाले आहे. ड्यूक ऑफ एडिनबर्गचे टायटल प्राप्त करणारे प्रिन्स फिलिप 99 वर्षांचे होते. ब्रिटिश राजघराण्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू विंडसर कॅसल येथे झाला
ब्रिटनची राणी एलिझाबेथ II चे (Queen Elizabeth II) पती प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचे निधन झाले आहे. ड्यूक ऑफ एडिनबर्गचे टायटल प्राप्त करणारे प्रिन्स फिलिप 99 वर्षांचे होते. ब्रिटिश राजघराण्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू विंडसर कॅसल येथे झाला. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ तब्बल 73 वर्ष एकत्र होते. प्रिन्सच्या निधनाने ब्रिटनवर शोककळा पसरली आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींवरील ब्रिटिश ध्वज प्रिन्स फिलिप यांच्या सन्मानार्थ खाली घेण्यात आले आहे व देशव्यापी शोकाची घोषणा केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रिन्स फिलीप आजारी होते. 2017 मध्ये, आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी स्वत: ला शाही सोहळ्यांपासून दूर ठेवण्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून ते क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसले होते. इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान, ते लंडनच्या पश्चिमेस, विंडसर कॅसल येथे राणीसमवेत राहत होते. 1947 मध्ये क्वीन एलिझाबेथचे प्रिन्स फिलिपशी लग्न झाले होते. पाच वर्षांनंतर, एलिझाबेथ राणी झाली.
प्रिन्स फिलिप यांचा जन्म 1921 मध्ये ग्रीसच्या कॉर्फू बेटावर झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांची आई राजकुमारी एलिस लॉर्ड लुईस माउंटबॅटनची मुलगी आणि क्वीन व्हिक्टोरियाच्या नातीची मुलगी होती.
(हेही वाचा: राजघराणे सोडल्यानंतर Prince Harry ने जॉईन केली BetterUp स्टार्टअप कंपनी; मिळाले Chief Impact Officer चे पद)
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II चे पती प्रिन्स फिलिप यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. प्रिन्स फिलिप यांना 16 फेब्रुवारी रोजी लंडनच्या खासगी किंग एडवर्ड सातव्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना सेंट बार्थोलोमेवच्या हृदयविकाराच्या विशेष रुग्णालयात नेले गेले. त्यानंतर त्यांना परत किंग एडवर्ड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. उपचारानंतर 16 मार्च रोजी त्यांना लंडनच्या रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांच्यावर कोरोना संसर्ग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारावर उपचार सुरू होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)