Seoul Peace Prize 2018 देऊन दक्षिण कोरिया मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव, दहशतवाद समूळ हटवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मांडले मत

नोटाबंदीपासून ते लोकशाहीला बळकटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी उचललेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजांसाठी जागतिक शांतता आणि इकोनॉमिक्ससाठी गौरव करण्यात आला आहे.

Narendra Modi Receives Seoul Peace Prize (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज '2018 Seoul peace prize' देऊन गौरवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) दोन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार ऑक्टोबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र तो आज प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे. नोटाबंदीपासून ते अगदी लोकशाहीला बळकटी देण्यासाठी मोदींनी उचललेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजांचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.

Seoul Peace Prize 2018 स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी यांना पुरस्कारासोबत 1 कोटी 30 लाख रूपयांची रक्कम मिळाली आहे. या पुरस्कराची रक्कम 'नमामि गंगे' या योजनेला दिली जाणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पुरस्कार स्विकारताना हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सोबत उभे रहिलेल्या कोट्यावधी भारतीयांचा आहे. असे मोदी यांनी म्हटलं आहे.

भारतामध्ये येत्या काही दिवसातच आगामी लोकसभा निवडणूकांसाठी तारखा जाहीर होणार आहे. भाजपासह नरेंद्र मोदी पुन्हा निवडणूक जिंकून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.