Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरी हलणार लवकरच पाळणा, पुतिन वयाच्या 70 व्या वर्षी होणार बाबा?
वयाच्या 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाबा होणार असून त्यांची गर्लफ्रेंड (Girlfriend) अलिना कबाएवा (Alina Kabaeva) बाळाला जन्म देणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समधून (International Media Report) अलिना गरोदर असल्याची चर्चा होत आहे.
रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. वयाच्या 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाबा होणार असून त्यांची गर्लफ्रेंड (Girlfriend) अलिना कबाएवा (Alina Kabaeva) बाळाला जन्म देणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समधून (International Media Report) अलिना गरोदर असल्याची चर्चा होत आहे. पुतिन यांना त्यांच्या पहिल्या पत्नी ल्यूडमिला ओचेरेत्नाया (Lyudmila Ocheretnaya) यांच्या पासून कॅटरिना (Katrina) आणि मारिया (Mariya) नावाच्या दोन मुली आहेत. पण 2013 मध्ये व्लादिमीर पुतिन आणि ल्यूडमिला ओचेरेत्नाया यांच्या घटस्फोटानंतर पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाएवा कायम चर्चेत असते.
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाएवा 39 वर्षाची असुन जगप्रसिध्द ऑलिम्पिक (Olympics) सुवर्णपदक (Gold Medal) जिमनॅस्ट खेळाडू, सेलिब्रिटी तसेच रशियाच्या राजकारणातही तिची विशेष ओळख आहे. अलिनानं 2015 मध्ये स्विर्त्झलँडमध्ये आणि 2019 मध्ये मॉस्कोमध्ये (Mosco) दोन मुलांना जन्म दिला होता, असा रशियाच्या (Russia) एका स्थानिक वृत्तपत्रातून खुलासा करण्यात आला आहे. त्यानंतर अलिना आता पुतिन यांच्या तिसऱ्या बाळाची आई होणार असल्याची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा आहे. खाजगी आयुष्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या पुतिन यांनी कधीही जाहीरपणे कबूल केलं नाही की, त्यांना किती मुले आहेत. (हे ही वाचा:-South Africa Shootout : दक्षिण आफ्रिकेतील बारमध्ये झालेल्या गोळीबारात 14 ठार तर 9 गंभीर जखमी)
पुतिनबाबत कायमच सोशल मिडीयावर अजीब दावे केले जाताता. गेल्या महिन्यातचं पुतिन यांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या दिसणारे पुतिन हा तोतया आहे,' असा दावा ब्रिटिश गुप्तहेरांनी केला होता. मात्र त्या दाव्याचे रशियाकडून खंडन करण्यात आले होते. आता व्लादिमीर पुतिन हे लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे. तरी यामागचं नेमक गुढ काय हे लवकरच सगळ्यांच्या पुढे येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)