Philippines Floods and Landslides: वादळ-पूर आणि भूस्खलन! 130 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता; ट्रामी चक्रीवादळामुळे फिलीपिन्समध्ये विध्वंस
वादळामुळे देशात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून, ढिगाऱ्याखाली दबून 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Philippines Floods and Landslides: समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळ ट्रामीने (Trami)दक्षिण-पूर्व आशियाई देश फिलीपिन्समध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस (Philippines Flood) झाला आहे. वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सुमारे 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक बेपत्ता आहेत. सुमारे 42 लाख लोकांना या वादळाचा फटका बसला असून त्यापैकी सुमारे 5 लाख लोकांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांर केले आहे.
फर्डिनांड मार्कोस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि लष्कराचे जवान स्निफर श्वानांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. टायफून ट्रामी उत्तर-पश्चिम फिलिपाइन्सपासून दूर गेले आहे. टायफून ट्रॅमी या वर्षी आग्नेय आशियाई द्वीपसमूहात धडकणारे सर्वात प्राणघातक आणि सर्वात विनाशकारी वादळ बनले आहे.
खोल पाण्यात असल्याने बचावकार्यात अडचणी
भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. प्रचंड पाण्याबरोबर समुद्रातील चिखल आणि कचरा किनाऱ्यावर आला. ट्रमी वादळामुळे या भागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. 60 दिवसांचा पाऊस 24 तासांत कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तेथे भरपूर पाणी असल्याने बचावकार्य करण्यात खूप अडचणी येत होत्या. लोकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत. सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. लोकांना घरून काम देण्यात आले आहे.
पॅसिफिक महासागर आणि दक्षिण चीन समुद्र यांच्यामध्ये देश वसलेला असल्यामुळे दरवर्षी देशाला सुमारे 20 टायफूनचा तडाखा बसतो. 2013 मध्ये हैयान या चक्रीवादळाने सुमारे 7000 लोकांचा बळी घेतला होता. यावेळी वादळाचा कहर होऊ दिला जाणार नाही. म्हणून अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि शक्य तेवढे बचावकार्य केले जात आहे.