Paris Shooting: पॅरीसमधील Kurdish Cultural Centre परिसरात गोळीबार, दोन ठार, अनेक जखमी; हल्लेखोरास अटक (Video)

या घटनेमध्ये दोन नागरिक ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना, कुर्दिश सांस्कृतिक केंद्राच्या ( Kurdish Cultural Centre) परिसरात घडली. पॅरिस सिटी हॉलमधील वरिष्ठांनीही या घटनेला दुजोरा दिला.

Paris Shooting. (Photo Credit: Twitter Video Grab@iGovindPandey )

अज्ञात व्यक्तींनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे मध्य पॅरीस (Paris Shooting) शुक्रवारी हादरुन गेले. या घटनेमध्ये दोन नागरिक ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना, कुर्दिश सांस्कृतिक केंद्राच्या ( Kurdish Cultural Centre) परिसरात घडली. पॅरिस सिटी हॉलमधील वरिष्ठांनीही या घटनेला दुजोरा दिला. गोळीबाराची घटना घडताच परिसरात एकच घबराट पसरली. नागरिक मोठ्या प्रमाणावर सैरावैरा पळू लागले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने हल्लेखोराला अटक केली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहे. हल्ल्याचा हेतू शोधणे हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.

पॅरीसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगोइर (Emmanuel Gregoire) यांनी ट्विट केले की, "अज्ञात बंदुकधाऱ्यांकडून हल्ला झाला आहे. सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार." दरम्यान, या हल्ल्यातील पीडित आणि ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्यापैकी एकाने सांगितले की, ही घटना अतीशय धक्कादायक आणि जीवघेणी होती. एका स्थानिक पत्रकाराने या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (ट्विटर) पोस्ट केला आहे. (हेही वाचा, Paris Explosion-Like Sound: स्फोटाच्या आवाजाने हादरले पॅरीस; फायटर जेटने ओलांडली ध्वनीतीव्रतेची कमाल पातळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण)

ट्विट

दरम्यान, पॅरिस पोलिसांनी सांगितले की, सध्या ते रुई डी'एंघियनवरील एका घटनेचा सामना करत आहेत. परिसरातील लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.बीएफएम टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले की, संशयित बंदूकधारी 60 वर्षीय व्यक्ती असून त्याला अटक करण्यात आली आहे. एका साक्षीदाराने फ्रेंच न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की, हल्लेखोराकडून सात किंवा आठ गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानत रस्त्यावर एकच धावपळ उडाली.