मुंबई दहशतवादी हल्ला, 2008 च्या मास्टरमाईंडपैकी एक Zaka ur-Rehman सह 4000 दहशतवाद्यांची नावं पाकिस्तान च्या Watchlist मधून गायब!
मुंबई वरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्यांंपैकी एक Zaka ur-Rehman सह पाकिस्तानने सुमारे 4 हजार दहशतवाद्यांची नावं वॉचलिस्टमधून हटवल्याचं वृत्त समोर आलं आहे
मुंबई वरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्यांंपैकी एक Zaka ur-Rehman सह पाकिस्तानने सुमारे 4 हजार दहशतवाद्यांची नावं वॉचलिस्टमधून हटवल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान भारतासह जगभरात दहशतवादी कृत्यांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाकिस्तानचा हात असल्याने आंतरराष्ट्रीय संस्था FATF ने पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केला आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दहशतवादी कारवायांना रोखण्यात पाकिस्तान 27 पैकी 14 गोष्टींची पूर्तता करत असल्याचं लक्षात आल्यानंतर FATF ने फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्ट मध्ये केला त्यानंतर आता पुन्हा जून महिन्यात पाकिस्तानच्या कारवायांचा आढावा घेतला जाणार आहे.
न्यूयॉर्क मधील स्टार्टअप Castellum, च्या दाव्य्यानुसार मागील दीड वर्षात पाकिस्तानने सुमारे 3800 नावं कोणतीही माहिती, स्पष्टीकरण न देता काढून टाकण्यात आली आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 1800 जणांची नावं कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय 9 मार्चनंतर काढून टाकली. यामध्ये लष्कर ए तोयबा आणि मुंबई हल्ल्याचा कट रचणार्या Zaka ur-Rehman याचादेखील समावेश आहे. ऑक्टोबर 2018 च्या FATF च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या वॉचलिस्टमध्ये सुमारे 7600 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश होता.
Castellum.AI च्या माहितीनुसार, 9 ते 27 मार्च दरम्यान खान सरकारने सुमारे 1069 नावं हटवली. तर 27 मार्च नंतर 800 आणि त्यापेक्षा अधिक नावांना हटवण्यात आलं आहे. तर 15 एप्रिलच्या एका पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, या यादीमध्ये सुमारे 7000 नावांमध्ये चूका होत्या, काही मृतांचा समावेश होता तर काहींची योग्य माहिती नसल्याने त्यांचा शोध घेणं कठीण असल्याचं सांगण्यात आलं आहे.