IPL Auction 2025 Live

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून कबुली; 'पाकमध्ये 40 दहशवादी संघटना सक्रिय होत्या,अमेरिकेला 15 वर्ष नव्हता थांगपत्ता'

इमरान हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यादरम्यान मंगळवारी, काँग्रेसच्या शीला जॅकसन यांनी आयोजित केलेल्या कॅपिटल हिल रिसेप्शन मध्ये याबाबत बोलत होते.

Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM)  इमरान खान (Imran Khan) यांनी तीन दिवसीय अमेरिका (America) दौऱ्यादरम्यान मंगळवारी, काँग्रेसच्या शीला जॅकसन (Sheela Jackson) यांनी आयोजित केलेल्या कॅपिटल हिल रिसेप्शनला (Capital Hill Reception)  हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलत असताना इमरान खान यांनी एक मोठा खुलासा केल्याचे समजत आहे. इमरान यांनी दिलेल्या कबुली मध्ये पाकिस्तान देशात मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या 40 दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे मान्य केले आहे. तसेच याबाबत पूर्व सरकारने अमेरिकेला जवळपास 15 वर्ष काहीच कल्पना दिली नव्हती, पण आता या संघटनांमुळेच आज पाकिस्तानवर अशा प्रकारे आर्थिक अडचण आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. डोनाल्ड ट्रम्प च्या वक्तव्यावर भारताची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हैराण, ट्विट करुन व्यक्त केले मत

 

ANI ट्विट 

इमरान खान यांच्या वक्तव्यानुसार, 9/11 रोजी झालेल्या दहशवादी हल्ल्यात पाकिस्तानचा काहीच हात नव्हता, त्यावेळी अफगाणिस्तान मध्ये अलकायदा सक्रिय होता, पाकिस्तान मध्ये तालिबानचे सैन्य उपस्थितीत नसूनही पाकिस्तान अमेरिकेच्या बाजुने युद्धात लढत होते. त्याचवेळी पाकिस्तानात या 40 दहशवादी संघटना कार्यरत होत्या, यावेळी काही गोष्टी बिनसल्या. एकीकडे देश प्रचंड मोठया आर्थिक अडचणीत अडकला होता, लोकांना त्यांच्या जगण्यावर देखील संशय येत होता, तर दुसरीकडे, दहशतवाद विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही आणखी काहीतरी करावे अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा त्यावेळी स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु होता. तरीही अमेरिकेला या संघटनांबद्दल सांगणे अपेक्षित होते, यासाठी पाकिस्तानचे पूर्व सरकार जबाबदार आहे, असे देखील इमरान यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, इमरान यांनी आताच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या अन्य नेत्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे म्हणत पाकिस्तानला अमेरिकेच्या मदतीची गरज आहे तसेच इतर देशांचा सुद्धा पाकिस्तानवर विश्वास बसावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.