Pakistan: नवरा मारहाण करायचा, पिडीतेने कोर्टात घटस्फोटासाठी केला अर्ज, इज्जतीसाठी महिलेच्या वडील आणि काकांनी कापले महिलेचे पाय
ज्यात एका महिलेच्या स्वतःच्या वडिलांनी आणि काकांनी तिचे पाय कापून तिला आयुष्यभरासाठी अपंग बनवले. मिळालेल्या माहितीनुसार, गुल टाऊनमध्ये राहणाऱ्या सोबिया बतुल शाहचा पती तिला रोज मारहाण करायचा..मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर महिलेच्या कुटुंबाची इज्जत दुखावली गेली.
Pakistan : पाकिस्तानातील इस्लामाबादमधील गुल टाऊनमधून मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. ज्यात एका महिलेच्या स्वतःच्या वडिलांनी आणि काकांनी तिचे पाय कापून तिला आयुष्यभरासाठी अपंग बनवले. मिळालेल्या माहितीनुसार, गुल टाऊनमध्ये राहणाऱ्या सोबिया बतुल शाहचा पती तिला रोज मारहाण करायचा..मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर महिलेच्या कुटुंबाची इज्जत दुखावली गेली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी अर्ज परत घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला, मात्र महिलेने ते मान्य केले नाही. याचा राग आल्याने वडील आणि काकांनी कुऱ्हाडी घेऊन सोबियाचे घर गाठले आणि तिचे पाय कापले. यानंतर त्यांनी तिला तसेच सोडून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेला रुग्णालयात दाखल केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला अटक करून महिलेला सुरक्षा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.