Pakistan Internet Disruption: पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा देशभर ठप्प, कारण गुलदस्त्यात
धक्कादायक म्हणजे संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट डाऊन असल्याचे वृत्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेट डाऊन होण्याचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.
पाकिस्तानमध्ये इंटरनेट अचानक डाऊन (Internet Down In Pakistan) झाले आहे. धक्कादायक म्हणजे संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट डाऊन असल्याचे वृत्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेट डाऊन होण्याचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. मात्र, त्यामुळे या देशातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना तक्रार केली आहे की, त्यांना सोशल मीडिया अॅप्स आणि इतर अनेक ऑनलाईन सेवा घेताना व्यत्यय येतो आहे. पाकिस्तानातील जीओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नागरिकांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर), इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook), टिकटॉक आणि युट्यूब (YouTube) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरुन इंटरनेट ठप्प झाल्याच्या तक्रारी आणि दावा केला आहे.
पाकिस्तान टेलिकम्यूनिकेशन ऑथेरेटी द्वारा मौन
डाऊनडिटेक्टर डॉट पीके पाकिस्तानात गूगल सेवा रविवारी सायंकाळी साधारण पाच वाजलेपासून बंद असल्याचे दर्शवत आहे. दरम्यान, जागतिक इंटरनेट निरीक्षक नेट ब्लॉकनेही पाकिस्तानात देशभर इंटरने आणि सोशल मीडिया अॅप्स ओपन करण्यात नागरिकांना समस्या जानवत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या टेलिकम्यूनिकेशन ऑथेरेटी (PTA) द्वारा अद्याप तरी इंटरनेट सेवा देशभर ठप्प झाल्याबाबत पुष्टी अथवा खंडण करणारे कोणतेही अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही. (हेही वाचा, X- Twitter Down: सोशल मीडीयामध्ये 'X' वर सेवा ठप्प)
इंटरनेट ठप्प होण्यापाठिमागे राजकीय कारण?
दरम्यान, इंटरनेट ठप्प होण्यापाठिमागे राजकीय कारण असल्याचा दावा केला जातो आहे. सांगितले जात आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तेहरीक ए इन्साफ (PTI) हा पक्ष पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीसाठ जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध करणार आहे. या पक्षाला टेलिथॉन द्वारे निधी उभारायचा होता. दरम्यान, इंटरनेट सेवाच ठप्प झाल्याचे, पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे. (हेही वाचा, Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी)
'इंटरनेट सेवा ठप्प ठेवणे ही कृती अभूतपूर्व'
नेटब्लॉक डिरेक्टर अल्पा टोकेरने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, इंटरनेट आऊटेजचा देशभर परिणाम झाला आहे. नागरिकांना विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. राजकीय कृतींना विरोध करण्यासाठी किंवा त्यांना मर्यादीत ठेवण्यासाठी अशा प्रकारची कृती करणे आणि संपूर्ण देशातीलच इंटरनेट सेवा ठप्प ठेवणे ही कृती अभूतपूर्व आहे. यापूर्वी अशा प्रकारची कृती केवळ व्हेनेझुएलामध्येच घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेथे राजकीय कृतांना मर्यादित ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला गेला.
पाकिस्तानातील विविध संस्था आणि प्रसारमाध्यमांनी कथीतरित्या म्हटले आहे की, अशा प्रकारे व्याप्त पातळीवर इंटरनेट डाऊन होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही साधारण 30 दिवसांपूर्वी म्हणजेच महिनाभरापूर्वी इंटरनेट सेवा काही तासांसाठी अशीच विस्कळीत झाली होती. ज्याचा परिणाम देशभरातील ऑनलाईन सेवांवर झाला होता. त्यावेळीही पीटीआय पार्टीने एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता. या पक्षाने 17 डिसेंबर रोजी एक व्हर्च्युअल पॉवर शो आयोजित केला होता. त्या दरम्यानच सबंध देशभरामध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. तेव्हाही पाकिस्तानातील इस्लामाबाद, कराची अशा विविध ठिकाणी नागरिकांना इंटरनेट वापरात अडथळा येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.