IPL Auction 2025 Live

Pakistan Political Crisis: 'इमरान खानने राजीनामा द्यावा, तरच पाकिस्तानातील राजकीय संकट संपेल', PTI संस्थापकाचा सल्ला

देश यापुढे अस्थिरता सहन करू शकत नाही आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा हट्ट सोडून द्यावा आणि पक्षातीलच कुणाला तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येवुन संधी द्यावी.

Pakistan Prime Minister Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) सुरू असलेल्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) सरकारचे संस्थापक सदस्य नजीब हारून (Najeeb Haroon) म्हणाले की, अशांतता संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांचा राजीनामा आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जिओ न्यूजच्या कार्यक्रमात हारून म्हणाले, 'पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा देवुन पक्षाच्या आणखी एका सदस्याला पंतप्रधान करण्यासाठी पुढे आणले पाहिजे.' ते म्हणाले, 'पुढे जाण्याचा आणि हे संकट संपवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, देश यापुढे अस्थिरता सहन करू शकत नाही आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा हट्ट सोडून द्यावा आणि पक्षातीलच कुणाला तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येवुन संधी द्यावी.

पंतप्रधान विरोधातील अविश्वास प्रस्तावाची तारीख इम्रान खान जवळ येत आहेत. सत्ताधारी पीटीआयच्या नॅशनल असेंब्लीच्या (MNA) अनेक असंतुष्ट सदस्यांनी सत्ताधारी पक्षाशी संबंध तोडल्याचे सांगितले. या खासदारांनी पुढील निवडणुकीत पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर तीन फेडरल मंत्र्यांनी पीटीआय सोडल्याचा दावाही त्यांच्यापैकी एकाने केला आहे.

इम्रान यान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची आशा 

पाकिस्तानातील विरोधी पक्ष इम्रान खान यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम करत आहेत. यामुळेच त्यांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात अविश्वास प्रस्ताव आणला होता. इम्रान खान सरकारला विश्वास आहे की ते अविश्वास प्रस्तावाला सामोरे जातील. मात्र यावेळी विरोधक इम्रान खान यांना बाहेरचा रस्ता दाखवतील असे वाटत आहे. (हे देखीव वाचा: Pakistan Political Crisis: पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्तेवर संकटाचे ढग, मित्रपक्षांची विरोधकांशी हातमिळवणी)

देशातील वाढत्या महागाईसाठी पंतप्रधान जबाबदार

पीटीआय खासदारांनी संसदेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर खान यांच्या विरोधात मतदान करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयासमोर अविश्वास प्रस्ताव मांडला आणि आरोप केला की इम्रानच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकार आर्थिक अडचणीत आहे. आणि देशातील वाढत्या महागाईसाठी जबाबदार आहे.