North Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा

उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी तापाची लक्षणे असलेल्या आणखी 4,570 लोकांची नोंद झाली, एप्रिलच्या उत्तरार्धापासून तापाच्या रुग्णांची एकूण संख्या 4.74 दशलक्ष इतकी नोंदवली गेली.

Kim Jong Un (Photo Credit: PTI)

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) आपल्या विचित्र निर्णय आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. शुक्रवारी किम जोंग उनने कोरोना व्हायरसबाबत (Coronavirus) असा दावा केला जो ऐकून तुम्ही डोके धराल. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दावा केला आहे की देशातील पहिले कोविड प्रकरण एलियन्सद्वारे पसरले आहे. उत्तर कोरियाने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, एलियन्सने हा विषाणू दक्षिण कोरियाच्या सीमेजवळून फुग्यांमधून पाठवला होता, ज्यामुळे त्यांच्या देशात कोरोना विषाणूचा प्रसार झाला.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, किम जोंग म्हणतो की, तपासणीनंतर असे आढळून आले आहे की, फुग्यांमध्ये व्हायरस भरून एलियन्सने तो दक्षिण कोरियाच्या सीमेजवळून त्यांच्या देशात पाठवून कोरोना व्हायरस पसरवला. त्याच वेळी, आपले हे विचित्र निष्कर्ष जाहीर केल्यानंतर, उत्तर कोरियाने 'सीमा रेषा आणि सीमेवरील भागांतील वारा आणि इतर हवामानातील घटना तसेच फुग्यांमधून येणार्‍या परदेशी वस्तूंशी व्यवहार करताना सावध राहण्याचे' आदेश दिले आहेत.

उत्तर कोरियाचे सरकारी माध्यम KCNA नुसार, उत्तर कोरियाने म्हटले आहे की, 'एप्रिलच्या सुरुवातीला 18 वर्षीय सैनिक आणि एक पाच वर्षांचा किंडरगार्टनर हे कुमगांगच्या पूर्वेकडील काउंटीमधील बॅरेक्स आणि निवासी क्वार्टरच्या आसपास अज्ञात सामग्रीच्या संपर्कात आले होते. त्यानंतरच त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर संपूर्ण देशात कोरोनाचा स्फोट झाला.

सरकारी माध्यमांनी सांगितले की, ‘तपासाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की एप्रिलच्या मध्यात कांगवॉन प्रांतातील कुमगांग काउंटीमधील इफो-री भागातून राजधानी शहरात आलेल्या अनेक व्यक्तींना तापाची लागण झाली होती आणि त्यांच्या संपर्कात तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती.’ (हेही वाचा: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा)

दरम्यान, उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी तापाची लक्षणे असलेल्या आणखी 4,570 लोकांची नोंद झाली, एप्रिलच्या उत्तरार्धापासून तापाच्या रुग्णांची एकूण संख्या 4.74 दशलक्ष इतकी नोंदवली गेली. प्योंगयांग चाचणी किटच्या कमतरतेमुळे दररोज तापाच्या रूग्णांची संख्या कोविड रूग्ण म्हणून निर्दिष्ट न करता जाहीर करत आहे.